आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांचा आवाज ऐकून गाडीत बसले केजरीवाल, सिरोपाही घालू दिला नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बटाला (पंजाब)- आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल शुक्रवारपासून पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी केजरीवाल अमृतसर आणि बटाला येथे गेले. दोन्ही शहरांमध्ये त्यांनी रोड शो केला. परंतु, यावेळी ते पूर्वीप्रमाणे बिनधास्त नव्हते. त्यांच्यावर शाई फेकण्याच्या आणि थप्पड मारण्याच्या तब्बल पाच घटना घडल्याने केजरीवाल काहीसे सजग दिसत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 150 लोकांचा घेरा करण्यात आला होता. त्यांना हार घालण्याची कोणत्याही व्यक्तीला परवानगी देण्यात आली नाही.
बटाला येथील धारिवाल बाजार परिसरात रोड शो सुरू असताना कोणीतरी अचानक गाडीसमोर फटाके उडवले. फटक्यांचा आवाज आल्यावर केजरीवाल लगेच गाडीत बसले.
अमृतसरमधील सुल्तानविंड परिसरात रोड शो आला तेव्हा एका व्यक्तीने त्यांना सिरोपा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, केजरीवाल यांच्या समर्थकांनी त्याला रोखले आणि त्याच्या हातून सिरोपा घेण्यात आला.
धारिवाल बाजारात आल्यावर केजरीवाल यांनी धाब्यावर चहा घेतला. दरम्यान, रोड शो सुरू असताना केजरीवाल यांना वारंवार खोकल्याची उबळ येत होती. प्रचार सभेला संबोधित करीत असतानाही केजरीवाल खोकलत होते.
केजरीवाल यांच्या रोड शोची छायाचित्रे बघ पुढील स्लाईडवर....