Home | National | Delhi | Kejriwal said BJP can kill me, after slapping matter

केजरीवाल यांना मारलेल्या झापड प्रकरणावर गुप्ताच्या ट्वीटचा पुरावा देत भाजपवर लावले गंभीर आरोप, म्हणाले- भाजप करू शकते माझी हत्या...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 19, 2019, 05:55 PM IST

केजरीवाल म्हणाले- भाजपवाले मला का मारत आहेत? माझा काय गुन्हा आहे?

 • Kejriwal said BJP can kill me, after slapping matter

  नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप लावले आहेत. ते म्हणाले की, ''माजी पंतप्रधान इंदिरा गांधीना ज्यापद्धतीने मारले, त्याचप्रकारे माजी हत्या होईल.'' पंजाबमध्ये दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, माझ्या सुरक्षेसाठी तैणात करण्यात आलेले सुरक्षा रक्षक भाजपला रिपोर्ट करतात. त्यांनी आरोप लावला आहे की, इंदिरा गांधींना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मारले,त्याप्रमाणेच ते मलाही मारतील.


  तर दुसरीकडे, भाजप आमदार विजेंद्र गुप्ताने शनिवारी ट्विटरवरून आरोप लावला की, सीएम केजरीवाल यांनी या झापड मारण्याच्या प्रकरणाच्या आधी गाडीतील सुरक्षा हटवण्याचे आदेश दिले होते. यावर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, रोजनामचेची माहिती गुप्ताला कशी मिळाली? केंद्र सरकार आपल्या ताकदीचा उपयोग करून केजरीवलांची हेरगिरी करत आहेत.


  केजरीवालांच्या आरोपांना पोलिसांनी दिला नकार
  दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या आरोपांना नकार दिला आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले की, पोलिस विभाग पूर्णपणे केजरीवालांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. ते आपले कर्तव्य जाणतात. ते पुढे म्हणाले की, देशातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही.


  4 मे रोजी केजरीवालांना मारली होती झापड
  4 मे रोजी दिल्लीच्या मोतीनगरमधील रोड शो दरम्यान एका व्यक्तीने अरविंद केजरीवालांना झापड मारली होती. मागील वर्षी त्यांच्यावर सचिवालयात मिर्ची पाउडर टाकण्याचा प्रयत्न केला होता. एप्रिल, 2016 मध्ये दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषदेत त्यांच्यावर बुट फेकण्यात आला होता. त्याशिवाय त्यांच्यावर शिडी देखील फेकण्यात आली होती.

Trending