आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिकाम्या खुर्च्या पाहून केजरीवालांनी रद्द केली सभा, आयोजकाच्या डोळ्यातून आले अश्रू, व्याजाने पैसे घेऊन केले होते कार्यक्रमाचे आयोजन...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवानी(हरियाणा)- दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल जेव्हाही भाषण देतात, त्यांची वेगळीच शैली नागरिकांना आवडते. लोक ताळ्या वाजवतात, पण हे प्रकरण उलटे झाले आहे. केजरीवालांकडून दु:खी होऊन यांना ढसाढसा रडला. त्यांचे अश्रू थांबतच नाहीयेत.

 


- त्या व्यक्तीचे नाव आहे दयानंद गर्ग. भिवानीच्या नवीन धान्य बाजारपेठेत पालक संमेलन आयोजिक केले होते. दयानंद याचे आयोजक होते. या कार्यक्रमात केजरिवालांना मुख्य पाहूणे म्हणून बोलवण्यात आले होते. पण ऐन वेळी कार्यक्रमात लोक आलेच नाहीत, आणि रिकाम्या खुर्च्या असल्याचे केजरिवालांना कळाले. मग त्यानंतर गर्ग साहेबांना असा झटका लागला की, ते जोराने रडू लागले.


- कार्यक्रम रद्द झाल्यानंतर गर्ग यांनी रडत मिडीयाला सांगितले की, त्यांनी कार्यक्रमासाठी व्याजाने पैसे घेतले होते. केजरीवाल न आल्यामुळे त्यांचे पैसे बुडाले, त्यांना अपमानित व्हावे लागले. त्यानंतर गर्ग यांनी कार्यक्रमाच्या जागेवरच आंदोलन केले.


- सांगितले जात आहे की, मागील 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. आयोजक दयानंद गर्ग यांनी घराची चिंता न करता पूर्णवेळ देत याचे काम हाती घेतले होते, पण सगळ्या मेहनतीवर पाणी पडले, आणि डोक्यावर कर्जाचे बोझे वाढले.


- गर्ग यांचे म्हणने आहे की, केजरीवालांमुळे त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा उरली नाहीये. कार्यक्रमासाठी त्यांनी कुटुंबालाही वेळ दिला नव्हता. त्यांची 6 वर्षाची मुलगी त्यांना एक पेन्सिल देण्याचा हट्ट करत होती, पण तीदेखील त्यांना देता आली नाही.


- तर आपचे प्रवक्ते जतिन राजा यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, या पार्टीचे काहीच नियोजन नव्हते, तयारीदेखील पूर्ण झालेली नव्हती. सीएम केजरीवाल यांना दुपारी 2 वाजता दिल्लीच्या सरकारी शाळांच्या ऑडीटच्या मीटींगसाठी जायचे होते.
 

बातम्या आणखी आहेत...