आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका-दीपिका नव्हे, या तरुणीची Figure आहे जगात Best; संशोधनातून शास्त्रज्ञांनी केले सिद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास विद्यापीठातील एका संशोधनात आजच्या जगातील महिलेच्या फिटनेस, डाएट आणि सौंदर्याबाबतचे निकष फेटाळून लावले आहेत. मॉडर्न आणि फिट राहण्यास काहीही करण्यास तयार असलेल्या तरुणी फिगर बाबतीत जागरुक झाल्या आहेत. फिटनेस आणि फक्त फिटनेसचा पाढा वाचणाऱ्या तरुणी पातळ दिसण्यासाठी अॅनारॉक्सिक (पातळ होण्याचा एक प्रकारचा आजार) च्या दिशेने वाटचाल करत आहेत. सायन्स आणि मानसशास्त्रानुसार, खरोखर सुंदर फिगर कशाला म्हणता येईल? आणि सौंदर्याच्या बाबतीत बेस्ट फिगर ठरवण्याचे निकष काय आहेत हे टेक्सास विद्यापीठाने जगासमोर मांडले आहेत.


टेक्सास विद्यापीठाच्या एका संशोधनात जगात बेस्ट फीमेल फिगर कशाला म्हणावे याचा अभ्यास करण्यात आला आहे. आणि त्याच संशोधनानुसार, ब्रिटिश मॉडेल केली ब्रुक हिचे फिगर बेस्ट असल्याचे सांगण्यात आले. टेक्सासच्या संशोधकांनी केली ब्रुकचे फिगर बेस्ट आणि आदर्श असल्याचे म्हटले आहे. संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, केली जाड नाही आणि पातळ देखील नाही. तिच्या शरीराचा प्रत्येक अंग परफेक्ट आहे. संशोधकांनी आपल्या रिसर्चपूर्वी हजारो लोकांना सेक्सी महिलांच्या फिगरचे आकार कसे असावे असा प्रश्न विचारला होता. यात लोकांनी महिलेची हाइट, वजन, चेहऱ्याचा आकार, हिप्स आणि इतर अंगांच्या आकाराचा उल्लेख केला आणि आपली मते मांडली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश लोकांनी दिलेल्या आकड्यांप्रमाणे, ब्रिटिश मॉडेलची फिगर त्यावर तंतोतंत बसते. त्यामुळेच, टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी तिचे फिगर जगातील बेस्ट फिगर असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...