आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ: कॉन्व्हेंटच्या आत विहिरीत तरंगत होता ननचा मृतदेह, गूढ उकलण्यासाठी पोलिसांची धावाधाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - केरळच्या एका कॉन्व्हेंटच्या विहिरीत एका ननचा मृतदेह आढळला आहे. ही घटना केरळच्या कोल्लममधील पठानपुरमची आहे. येथील माउंट टाबोर कॉन्व्हेंटच्या विहिरीत 55 वर्षीय ननचा मृतदेह आढळला. 

 

मृत ननचे नाव सुजन मॅथ्यू असून त्या सेंट स्टीफेंस स्कूलमध्ये शिकवत होत्या. हे स्कूल केरळच्या राजधानीपासून 80 किमी अंतरावर आहे. पोलिसांच्या मते, कॉन्व्हेंटच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीजवळ रक्ताचे डाग पाहिले. ही घटना सकाळी 9 वाजताची आहे. यानंतर कर्मचाऱ्यांनी ननचा मृतदेह विहिरीत तरंगताना पाहिला.

 

#Kerala: A 55-year-old nun found dead inside a well in Mount Tabor Dayara Convent in Kollam's Pathanapuram. Police at the spot. pic.twitter.com/FXCtRae4mi

— ANI (@ANI) September 9, 2018

 

मृत सुजन मागच्या 12 वर्षांपासून या स्कूलशी जोडलेल्या होत्या. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, अद्याप याची माहिती मिळालेली नसून पोलिस तपास सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...