आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी घरे उभारली : केरळ : हँडलूम उद्योगाला 5 सेंमीच्या बाहुलीने दिली नवऊर्जा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - कुट्टनाद जिल्ह्यातील अॅलेप्पी बेटावर सुंदर हाऊसबोट्स पर्यटकांच्या प्रतीक्षेत उभ्या असल्याचे दिसते. धानासाठी आेळखल्या जाणाऱ्या द्रोणासारख्या क्षेत्रावर नैसर्गिक संकट आेढवल्याने ते उद्ध्वस्त झाले. बॅकवॉटरच्या किनाऱ्यावरील काही घरांची पडझड झाली आहे. वाहून गेलेल्या घरांची जागा आता पूर प्रतिबंधक घरांनी घेतली आहे. हे सर्व 'आय अॅम फॉर अॅलेप्पी' अभियानामुळे प्रत्यक्षात येऊ शकले. जिल्हाधिकारी कृष्णा तेजा यांची ही संकल्पना आहे. या अभियानातून उद्ध्वस्त गाव उभे राहिले. त्यामुळे तेजा यांची खूप लोकप्रियता वाढली. नवीन बनवलेल्या घरांमध्ये चेन्नई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या डिझाइन केलेल्या घरांचाही समावेश आहे. एर्नाकुलम हँडलूम उद्योगाला ५ सेमीच्या बाहुलीने नवऊर्जा दिली आहे. या उद्योगाला पुन्हा उभे केले आहे. २५ रुपयांच्या या बाहुलीच्या ७० लाख ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे सहा महिन्यांत सुमारे २.५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. हँडलूम उद्योगाच्या वार्षिक उत्पन्नाएवढी ही उलाढाल ठरली. 

 

एर्नाकुलम हँडलूम उद्योगनगरीतील सहापैकी तीन वर्कशॉप १० दिवस पुराच्या पाण्यात होते. तेथील कपडे, धागे सर्व पाण्यात गेले. भिजून कुजलेल्या कपड्यांना जाळून टाकल्यास प्रदूषण वाढेल. हा विचार करून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे गोपीनाथ पेरिल यांनी एनजीआे चालवणाऱ्या लक्ष्मी मेनन यांच्या मदतीने एक प्रयोग केला. तो कमालीचा यशस्वी ठरला. लक्ष्मी यांनी कपडा व धाग्यांपासून छोट्या बाहुल्या तयार केल्या. त्याला जगभरातून ऑर्डर मिळाल्या. बाहुली किंमत २५ रुपये आहे. एक साडी १५०० रुपयांना विकत हाेती. एका साडीतून ३५० बाहुल्या बनवल्या. अर्थात त्यातून ९ हजार रुपये मिळाले. पुराने उद्ध्वस्त झालेल्या विणकरांना या बाहुलीच्या संकल्पनेने उभारी दिली. त्यांची कमाई दुपटीवर गेली. आता ९० टक्के वर्कशॉप हेच काम करू लागले आहेत. एका युनिटने ३९ लाख मिळवले.
 
देवूच्या खेळण्यांतून झाली नव्या आनंदयात्रेची सुरुवात 
नौदलाचे निवृत्त अधिकारी कॅप्टन रमेश बाबू अॅलेप्पीला आले होते. एक दिवस त्यांनी ३ वर्षांची मुलगी देवू कचऱ्यातून खेळणे शोधून त्याच्याशी खेळताना पाहिली. तिला विचारले तेव्हा पुरानंतर तिच्याकडे केवळ हीच तुटलेली बाहुली राहिल्याचे त्यांना समजले. त्यानंतर रमेश यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर खेळणी गोळा करण्याची मोहीम सुरू केली. मग देशभरातून ट्रक भरभरून खेळणी येऊ लागली. ही खेळणी त्यांनी पूरग्रस्त मुलांमध्ये वाटण्यास सुरुवात केली. सर्वात मोठी खेळणी त्यांनी देवूला पाठवली होती. कारण या गोष्टीची सुरुवात तिच्यापासून झाली होती. 

 

चेन्गन्नूरची बहुतांश घरे पुन्हा उभी, २८ लाखांची देणगी 
नौदलाचे निवृत्त अधिकारी कॅप्टन रमेश बाबू अॅलेप्पीला आले होते. एक दिवस त्यांनी ३ वर्षांची मुलगी देवू कचऱ्यातून खेळणे शोधून त्याच्याशी खेळताना पाहिली. पुरानंतर तिच्याकडे केवळ हीच तुटलेली बाहुली राहिल्याचे त्यांना समजले. त्यानंतर रमेश यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर खेळणी गोळा करण्याची मोहीम सुरू केली. मग देशभरातून ट्रक भरभरून खेळणी आली. ती त्यांनी पूरग्रस्त मुलांमध्ये वाटली. मोठी खेळणी त्यांनी देवूला पाठवली होती. कारण या गोष्टीची सुरुवात तिच्यापासून झाली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...