आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तिरुवनंतपुरम- सबरीमाला मंदिरात ५० पेक्षा कमी वयाच्या दोन महिलांच्या प्रवेशाविरोधात गुरुवारी केरळमध्ये आंदोलन तीव्र झाले. सबरीमाला कर्मा समितीने पुकारलेल्या बंद दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. आंदोलकांनी कन्नूरमध्ये माकपा चालवत असलेला एक विडी कारखाना व तिरुवनंतपुरममध्ये एका ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकले. सत्तारूढ माकपाचे कार्यालय व दुकानांची तोडफोड करण्यात आली. अनेक ठिकाणी बंद समर्थक व माकपा कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडाली. त्रिशूरमध्ये पीएफआयची शाखा सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांसोबतच्या बाचाबाचीत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना भोसकण्यात आले. बुधवारी बसेसची मोठ्या प्रमाणात ताेडफोड झाल्यानंतर गुरुवारी सरकारी बसेस बंद ठेवण्यात आल्या. शहरी व ग्रामीण भागात केवळ काही ऑटो रिक्षाच सुरू होत्या. बुधवारी पत्थनमिठ्ठामध्ये आंदोलन करणाऱ्या लोकांवर माकपा कार्यकर्त्यांनी छतावरून दगडफेक केली. यामध्ये जखमी ५५ वर्षीय व्यक्तीचा रात्री मृत्यू झाला. असे असले तरी हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाल्याचा दावा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला आहे. हिंसाचाराच्या घटनांबाबत केरळचे राज्यपाल पी.सदाशिवम यांनी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल मागितला आहे.
तिरुवनंतपूरम :
सबरीमालाच्या मुद्द्यावर गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान केरळ परिवहन विभागाच्या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले.
अवमानना प्रकरणात लवकर सुनावणीस नकार
महिलांच्या प्रवेशानंतर मंदिराचे शुद्धीकरण केले. हा प्रकार न्यायालयाचा अवमान आहे. यासंदर्भात दाखल याचिकेवर लवकरच सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविराेधात दाखल याचिकेदरम्यान ही सुनावणी केली जाईल.
२२६ जणांना अटक, ३३४ जण ताब्यात
केरळमध्ये सुरू असलेल्या विराेध प्रदर्शनादरम्यान २२६ जणांना अटक केली आहे. तसेच ३३४ जणांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले आहे. निर्देशांकावर कारवाईसाठी पोलिसांनी ऑपरेशन ब्रोकन विंडो नावाने अभियान सुरू केले आहे. तामिळनाडूत विरोध प्रदर्शन करणाऱ्या ६० जणांना ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री विजयन म्हणाले, भाजप व संघाचा कट
राज्यात हाेणारी निदर्शने व हिंसाचारास मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भाजप व संघाला दाेषी ठरवले. त्यांनी म्हटले की, कट रचणाऱ्याविराेधात कठाेर कारवाई केली जाईल. सरकार जनभावना लक्षात घेईल, परंतु घटनेनुसारच सरकार काम करेल. राज्यात हिंसाचारात राज्य परिवहन मंडळाच्या ७९ बसेसची ताेडफाेड झाली आहे. ३१ पाेलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.