आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासबरीमाला - केरळमधील सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिर शनिवारी दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले. मात्र, सुप्रीम कोर्टाचा आदेश न मानता राज्य सरकारने पहिल्याच दिवशी १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुरक्षा पुरवली नाही. आंध्रातून आलेल्या ३० भाविकांतील १० महिलांना वय नियमांत बसत नसल्याचे सांगत परत पाठवले.
सुमारे ८०० वर्षे जुन्या या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी होती. ही प्रथा संपवून सुप्रीम कोर्टाने २८ डिसेंबर २०१८ रोजी प्रत्येक वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाची परवानगी दिली होती. मात्र, भगवान अय्यप्पांच्या भक्तांचा याला विरोध आहे. केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारने गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाचा आदेश लागू करण्यासाठी १० ते ५० वर्षे पयोगटातील महिलांना सुरक्षा व्यवस्था पुरवून मंदिरापर्यंत पोहोचवले होते. तेव्हा याविरुद्ध हिंसक निदर्शने झाली होती. या वर्षी मात्र सरकारने अशी कोणतीही सुरक्षा पुरवली नाही.
तृप्ती देसाईचा इशारा :
दरम्यान, सबरीमालात मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी २० नोव्हंेबर रोजी मंदिर प्रवेशाची घोषणा केली आहे. पोलिसांनी आपल्याला सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.