आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाढ झोपेत होते कुटुंब, अचानक रात्री 3 वाजता भुंकू लागला पाळीव कुत्रा, मालकाने वेळीच समजला इशारा म्हणून वाचला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ इदुक्की - केरळात मुसळधार पावसामुळे अर्ध्या राज्यात पूरसदृश्य स्थिती तयार झाली आहे. सर्वात जास्त खराब परिस्थिती इदुक्की जिल्ह्यात आहे. येथे हजारो लोकं घर सोडून बचाव शिबिरांमध्ये राहण्यासाठी मजबूर आहेत. पूर आणि बचावादरम्यान केरळातून अनेक थरारक प्रकरणे समोर येत आहेत. यापैकीच एक आहे इदुक्की जिल्ह्यातील कंजिकुझी गावातील घटना. येथील मुदमान पी. यांच्या कुटुंबाचा जीव त्यांच्या पाळीव कुत्र्यामुळे वाचला.

 

घरात गाढ झोपेत होते सगळे, रात्री 3 ला अचानक भुंकू लागला रॉकी
मुदमान पी. यांनी सांगितले, 'आम्ही घरात झोपलेलो होतो, अचानक रात्री 3 वाजता रॉकी भुंकू लागला, तसे तो नेहमी वागत नाही, मग मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपलो. परंतु काही वेळानेच रॉकी आणखी जोरजोरात भुकू लागला, यानंतर मला खटकले म्हणून मी पूर्ण कुटुंबाला उठवून रॉकीला बाहेर बघायला गेलो.'

 
लँडस्लाइडमध्ये दबले अख्खे घर
मुदमान म्हणाले- 'आम्ही घराबाहेर आलोच होतो, तेवढ्यात घराजवळ डोंगरावर लँडस्लाइड झाली आणि आमचे घर त्याखाली दबून गेले. तेव्हाच आम्हाला कळाले की, रॉकी का भुंकत होता. रॉकीमुळेच आमच्या पूर्ण कुटुंबाचा जीव वाचला.' मुदनान आता आपल्या कुटुंबासोबत रॉकीला घेऊन मदत शिबिरात राहत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...