आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिरुवनंतपुरम - पूरग्रस्त केरळमध्ये नागरिकांना रविवारी पावसापासून काहीसा दिलासा मिळाला. गेल्या 11 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस आणि पुराचे थैमान आहे. पाऊस तूर्तास थांबल्याने प्रशासनाने जारी केलेला रेड अॅलर्ट आता मागे घेतला आहे. राज्यात गेल्या 94 वर्षांत पडलेला हा सर्वात मोठा पाऊस आणि पूर आहे. या जलप्रलयात एकूणच 324 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बचाव कार्यासाठी सैनिक इस्रोच्या उपग्रहांच्या माध्यमातून रिअल टाइम अपडेट घेत आहेत. केंद्र आणि अनेक राज्यांसह नागरिकांनी सुद्धा या राज्यासाठी मदत जारी केली आहे. दरम्यान या बचाव मोहिमेत एका जवानाने चिमुकल्याला एअर लिफ्ट केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इंडियन आर्मीने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला.
कोच्ची नेवी बेसवरून झेपावणार प्रवासी विमान
दरम्यान रविवारी नौदलाचे जहाज दीपक जीवनावश्यक वस्तू आणि पिण्याचे पाणी घेऊन दक्षिणी नौदल तळावर पोहोचले आहे. केंद्राकडून परवानगी मिळताच सोमवारपासून प्रवासी विमान कोच्चीच्या नेव्ही बेसवरून उड्डान घेतील. 14 ऑगस्ट रोजी पेरियार नदीत आलेल्या पुरामुळे विमानतळ पूर्णपणे बुडाले. त्यामुळे, 26 ऑगस्ट पर्यंत कोच्ची विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.
आमदार-खासदारांना वेतन दान करण्याचे आवाहन
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पूरग्रस्तांसाठी जास्तीत-जास्त लोकांनी पुढाकार घेऊन मदत करावी अशी विनंती केली आहे. सोबतच, त्यांनी सर्वच आमदार आणि खासदारांना आपले वेतन मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान करण्याचे आवाहन केले आहे. केरळमध्ये रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहता हवामान विभागाने 14 जिल्ह्यांमध्ये लागू केलेला रेड अॅलर्ट परत घेतला आहे. आता राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि 2 राज्यांमध्ये येलो अॅलर्ट आहे. पाऊस पूर्णपणे थांबल्यास तो देखील परत घेतला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.