आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: केरळमध्ये मुसळधार, पुराने हाहाकार! 80 जणांचा मृत्यू, 1.5 लाख लोक शिबीरांमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने हाहाकार माजला आहे. 8 ऑगस्टपासून आतापर्यंत राज्यात पाऊस, दरड कोसळी आणि पुराने 80 लोकांचा जीव घेतला आहे. सद्यस्थितीला दीड लाखांहून अधिक लोक शिबीरांमध्ये राहत आहेत. राज्यातील 14 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये पूर आणि पूरसदृश्य परिस्थिती आहे. केरळच्या 39 पैकी 35 धरणांचे दार उघडण्यात आले आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळ संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला. तसेच त्यांनी ट्वीट करून लोकांना पूरग्रस्तांच्या आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. पावसाळा सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत केरळमध्ये सरासरी 71 इंच पाऊस पडले आहे. 

 

#WATCH: Rescue operations held by Coast Guard helicopters over Ernakulam, earlier today. 132 people have been rescued from Thrissur, Aluva & Perumbavoor by Coast Guard helicopters today. #KeralaFloods pic.twitter.com/JqJ0dsbSPs

— ANI (@ANI) 16 August 2018

मध्य केरळमध्ये वाहतूक कोलमडली...
> मध्य केरळमध्ये अनेक भागांत सर्वजनिक वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. दक्षिण रेल्वे आणि कोच्ची मेट्रोने गुरुवारी आपल्या सर्व सेवा स्थगित केल्या. लष्कराने बचाव मोहिमेत वेग आणला आहे. लष्करासह नौदल, हवाई दल आणि कोस्ट गार्डसह एनडीआरएफचे पथक बचाव मोहिमा राबवत आहेत. 
> मुन्नारमध्ये 82 पर्यटक पूर आणि भूस्खलनात बसमध्ये अडकले. मलमपुझाच्या वलियाकडू गावात लष्कराने 35 फूट लांब ब्रिज बांधून 100 हून अधिक लोकांना वाचवले. एनडीआरएफ आणि नौदलाच्या 21 टीम विविध भागांमध्ये बचाव मोहिमा राबवत आहेत. एवढेच नव्हे, तर पुढील 4 दिवस नागरिकांना आणखी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...