आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिरुवनंतपुरम - शतकातील सर्वात भयान जलप्रलयाला सामोरे जाणाऱ्या केरळच्या 12 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 324 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्र सरकारने या पूरग्रस्तांसाठी एकूण 600 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. महाराष्ट्र सरकारने या राज्याला 20 कोटींची मदत जाहीर केली. केवळ सरकारच नव्हे, तर सामान्य लोक सुद्धा मदतीसाठी समोर येत आहेत. त्यापैकीच एक 21 वर्षीय विद्यार्थिनी आणि मच्छी विक्रेती हनान हिने 1.5 लाख रुपयांची मदत दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच विद्यार्थिनीला मच्छिमारीसाठी ट्रोल करण्यात आले होते. तर दुसरीकडे, कन्नूर जिल्ह्यातील 68 वर्षीय रोहिणी यांनी आपल्या एका महिन्याची पेन्शन केरळच्या गरजवंतांना दान केली. या दोघांचीही मदत मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्यात आली आहे.
गरजवंतांना मदत केल्याचे समाधान -हनान
21 वर्षीय हनान इदुक्की जिल्ह्यातील एका खासगी महाविद्यालयात B.Sc करत आहे. ती आपल्या उदरनिर्वाहासाठी मासे विक्रीचा व्यवसाय करते. तिचा संघर्ष सोशल मीडियावर लोकांना सांगण्यात आला तेव्हा तिचे खूप कौतुक झाले. परंतु, अनेकांनी तिला ट्रोल देखील केले. सोशल मीडियावर व्हायरल ठरलेली ही तरुणी त्यावेली शिकत नव्हती. हीच गोष्ट लक्षात घेत युझर्सने तिच्यासाठी सोशल मीडियावरूनच निधी गोळा केला आणि तिच्या शिक्षणाची इच्छा पूर्ण केली. शिक्षणासाठी आलेल्या निधीमधूनच तिने 1.5 लाख रुपये दान केले आहे. "मला हे पैसे लोकांनीच दिले होते. मी त्यांनाच परत करत आहे. गरजवंतांची मदत करू शकले याचे मला खूप समाधान वाटते." अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
19 हजार कोटींचे नुकसान; केंद्राकडे 2 हजार कोटींची मागणी
- प्राथमिक अंदाजानुसार, पुरामुळे या राज्याला 19 हजार कोटींचे नुकसान झाले. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केंद्राकडे 2 हजार कोटींची मागणी केली. पंतप्रधान मोदी यांनी राज्याच्या मागणीनुसार धान्य, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा करणार, अशी हमी दिली.
- पुरात ग्रामीण भागात अनेकांचे संसार उघड्यावर आले. जे लोक या आपत्तीत बेघर झाले अशांना पंतप्रधान गृह योजनेअंतर्गत (ग्रामीण) घरे दिली जातील. दरम्यान, मुख्यमंत्री विजयन यांनी उपचारांसाठी नियोजित अमेरिका दौराही रद्द केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.