आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये आढळले अजून 5 कोरोनाग्रस्त रुग्ण, देशात संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या 41 वर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरुणाचल प्रदेशची परदेशी प्रवाशांना राज्यात येण्यास बंदी
  • टेलीकॉम कंपन्यांनी मोबाइल रिंगटोनमध्ये अवेअरनेस मेसेज सुरू केला

नवी दिल्ली- भारतात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 40 रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये आज(रविवार) पाच रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळले आहेत. यापैकी तीन रुग्ण काहीद दिवसांपूर्वीच इटलीवरुन परत आले होते. तमिळनाडूमध्येही एक व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळला आहे. शनिवारी ओमानवरुन आलेल्या एका रुग्णालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच, अरुणाचल प्रदेश सरकारने राज्यात परदेशी नागरिकांना येण्यावर बंदी घातली आहे. परदेशी नागरिकांना येथे येण्यासाठी प्रोटेक्टेड एरिया परमिट (पेप) घ्यावे लागले, आता त्यावरच बंदी घातली आहे.

दिल्लीमध्ये आइसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांचे सँपल तपासणीसाठी पाठवले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत संक्रमणाचे तीन पॉजिटिव्ह केसेस समोर आले आहेत, तर एका व्यक्तीवर संशय आहे. केजरी म्हणाले की, पहिला संक्रमित 105 जणांच्या संपर्कात आला होता, दुसरा 168 आणि तिसरा 64 जणांच्या संपर्कात आला. सर्वत 337 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.

केरळमध्ये इटलीवरुन आलेल्या नागरिकांमध्ये संक्रमण आढळले

शनिवारी अमृतसरमध्ये इटलीवरुन आलेल्या दो, लद्दाखमध्ये इराणवरुन आलेल्या दोन, तमिळनाडूमध्ये ओमानवरुन आलेल्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याची पुष्टी झाली आहे. केरळचे आरोग्यमंत्री केके शैलजा म्हणाले की- राज्यात पाच जणांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. यापैकी तीन नुकतेच इटलीवरुन आले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने इतर दोघांना कोरोना झाला. त्या सर्वांना सध्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...