आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारील कुत्रीसोबत होते अफेअर, नाराज झालेल्या मालकाने गळ्यात नोट लिहून कुत्र्याला दिले हकलून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम(केरळ)- तिरुवनंतपुरममध्ये एक विचीत्र प्रकरण समोर आले आहे. येथील एका मालकाने त्याच्या कुत्र्याचे शेजारी राहणाऱ्या कुत्रीसोबत अफेअर असल्यामुळे त्याला घरातून हकलून दिले. इतकच काय तर त्याला घरातून हकलताना त्याच्या पट्यावर एख नोट लिहीली. त्यात त्याने कुत्र्याला घरातून बाहेर हकलण्याचे कारण लिहीले आहे. एका प्राणी प्रेमीने त्या भटकणाऱ्या कुत्र्याला पकडून त्याच्या कॉलरवरील नोट वाटल्यानंतर प्रकरणाचा खुलासा झाला.

 

पांढऱ्या रंगाचा पामेरियन कुत्रा शहरातील एका मोठ्या बाजारात फिरत होता, त्यावेळी प्राणी प्रेमी संस्था पीपल्स फॉर अॅनिमलची वॉलेंटियर शमीनने त्याला पाहीले. तिने त्याला पकडल्यावर त्याच्या गळ्यातील नोट पाहून तिला धक्का बसला.


मळ्यालम भाषेत लिहीलेल्या नोटमध्ये लिहीले होते, ''हा कुत्रा चांगल्या जातीतला आहे. याचा स्वभावही चांगला आहे. हा जास्त जेवणदेखील करत नाही. याला कोणताच आजार नाहीये. हा दर पाच दिवसांनी अंघोळ करतो. फक्त हा थोटा भुंकतो. मागील तीन वर्षात याने कोणलाच विनाकारण चावले नाही. याला दुध, बिस्कीट आणि अंडे खायला दिले जाते. हा इतका चांगला असूनही याचे शेजारील कुत्रीसोबत अफेअर असल्यामुळे याला आम्ही सोडून देत आहोत."