Home | National | Other State | Kerala Woman booked for raping 9 year old boy

पालकांसोबत क्लिनिकमध्ये गेला होता मुलगा, डॉक्टरांनी चौकशी केल्यानंतर सांगितली स्वतःवरील अत्याचाराची कथा, जी ऐकून मुलाचे पालकही झाले शॉक्ड

नॅशनल डेस्क | Update - Feb 12, 2019, 02:48 PM IST

शेजारी राहणाऱ्या काकूनेच केले असे निर्लज्ज कृत्य, 9 वर्षांच्या मुलासोबत केले वाईट काम

 • Kerala Woman booked for raping 9 year old boy

  मलप्पुरम : केरळमध्ये पोलिसांनी 36 वर्षीय महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 9 वर्षाच्या मुलावर रेप केल्याचा महिलेवर आरोप आहे. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा कुटुंबियांसोबत एका लोकल क्लिनिकमध्ये गेलेल्या मुलाने डॉक्टरांसमोर त्याच्यावर झालेल्या टॉर्चरची माहिती दिली. मुलाचे पालकही हे सर्व ऐकून शॉक्ड झाले. डॉक्टरांनी लगेच ही बातमी चाइल्डलाइन केंद्राला दिली. त्यानंतर मुलाचा जबाब रेकॉर्ड करून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.


  महिलेने 9 वर्षीय मुलाचे केले शोषण
  - ही घटना तेनिपलम शहरातील आहे. चाइल्डलाइनने सांगिलते की, पीडित मुलाचे एक वर्षांपासून यौन शोषण केले जात होते. ही गोष्ट त्याने आपल्या जबाबात सांगितली आहे.
  - चाइल्डलाइनचे कोऑर्डिनेटर अनवर यांच्यानुसार, महिला खूप दिवसांपासून मुलाचा चुकीच्या पद्धतीने सेक्शुअली वापर करत होती आणि यामुळे तो डिप्रेशनमध्ये आहे.
  - आरोपी बाहेरची नसून मुलाच्या काकाची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. काकाचे घरही मुलाच्या घराजवळ आहे.


  पॉक्सो कायद्यानुसार केस
  - पोलिसांनी पॉस्को ऍक्ट कलम 5 आणि 6 अंतर्गत केस दाखल केली आहे. पोलीस अधिकारी बीनू थॉमस यांच्यानुसार. चाइल्ड लाइनच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending