आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाकाठचे ९२ टक्के वृक्ष तोडल्यानेच केरळसारखे महापुराचे संकट : सद‌्गुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद््गुरू जग्गी वासुदेव यांनी ‘रॅली फाॅर रिव्हर्स’नंतर अाता ‘यूथ अँड ट्रुथ’ हे नवे अभियान सुरू केले अाहे. तरुणाईला जाेडणे हा त्यामागील मुख्य उद्देश. हे अभियान तरुणाला प्रेरणा देईल, त्यांच्या अायुष्यात स्थिरता अाणण्यास मदत करेल. या अभियानाच्या निमित्ताने व ‘रॅली फाॅर रिव्हर्स’ माेहिमेत झालेल्या राजकारणाबाबत सद््गुरूंशी केलेली बातचित...  


तरुण अात्महत्या करताेय, त्यांना अाधार देऊ


प्रश्न : ‘यूथ अँड ट्रुथ’ अभियान काय?  
उत्तर :
तरुणाईत खूप ऊर्जा असते. मात्र अाज देशात प्रतितास २५ वर्षांहून कमी वयाचा तरुण अात्महत्या करताेय. यूथ अँड ट्रुथ माेहीम तरुणांच्या अायुष्यात स्थिरता व स्पष्टता अाणू शकेल.  
प्रश्न : तुम्ही अायुष्याचे सत्य तरुणाईला कसे पटवून देणार?  
उत्तर :
अाम्ही त्यांना गाेस्पेलचे (येशूचे सुसमाचार) गांभीर्य नव्हे, गाॅसिपमधून (गप्पांतून) समजावून सांगू.  
 

प्रश्न : तरुणाईच्या मनात लाखाे प्रश्न अाहेत, ते तुम्हाला कसे समजतील?  
उत्तर :
अामच्या मते सुमारे १० लाख प्रश्न येतील. त्याला स्टँडर्ड उत्तर देणे हे माझे काम नाही. मला वाटते त्यांनी फक्त सखाेल प्रश्न विचारावेत.  
 

प्रश्न : ‘रॅली फाॅर रिव्हर्स’ची स्थिती काय अाहे? तुम्ही याबाबत शिफारशींचा दस्तएेवज पंतप्रधानांना दिला का?  
उत्तर :
 अामच्या दस्तएेवजातील ८० % शिफारशी सरकारच्या धाेरणात समाविष्ट हाेतील. हेच उद्दिष्ट हाेते.
 

प्रश्न : केरळमधील महापुराबद्दल...?
उत्तर :
‘कावेरी नदी चालत आली तर भाग्य बदलून टाकते, धावत आली तर संकट येते’, अशी एक म्हण आहे. ६०-७० वर्षात आपण गंगा किनाऱ्यावरील ९२% वृक्ष तोडले. हे वृक्ष नद्यांचे ५०% पाणी थांबवू शकतात. 
 

प्रश्न : तुम्ही कोणता धर्म मानत नाहीत, परंतु शिवरात्र उत्साहाने साजरी करता?
उत्तर :
शिवरात्रीला आपल्या ग्रहांतील ऊर्जेचा प्रवाह वरच्या दिशेने असतो. तसे तर दर पौर्णिमा, अमावस्येला समुद्राची पातळी अापोआप वाढतेच. शरीरात ७२% पाणी आहे. ते पण वरच्या दिशेने प्रवाहित होत नसेल का? विज्ञान सांगते, शिवरात्रीला उभे राहा, झोपू नका. म्हणून जागरण करतो.
 

प्रश्न :२०१९मध्ये एनडीए जिंकेल की विरोधकांची महाआघाडी?
उत्तर :
महा? आघाडी आहे, पण ती महा कुठेय?
 

प्रश्न : मोदी जिंकले तर तो विजय कोणत्या घटकांमुळे शक्य होईल?
उत्तर :
आर्थिक विकास हाच एकमेव घटक असेल. अनेक कामे झाली परंतु ती लोकांपर्यंत पोहचायची आहेत. आपल्याला लाभ झालाय याची जाणीव व्हायला हवी. माझ्या दृष्टीने नोटबंदी, जीएसटी हे चांगले निर्णय होते..

बातम्या आणखी आहेत...