आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोट्टायम : जडीबुटीने मानवी आजार दूर करण्याबाबत आपण ऐकले असेल, मात्र केरळचे के. बिनू (५१) अशी व्यक्ती आहेत, जे आयुर्वेदाद्वारे झाडाझुडपांवर उपचार करतात. व्यवसायाने शालेय शिक्षक असलेल्या बिनू यांनी १०० वर्षांपेक्षा जुन्या वठलेल्या काही झाडांना पुन्हा जिवंत केले आहे. वृक्ष संरक्षणासाठी ते गेल्या १० वर्षांपासून झटताहेत. पंचक्रोशीतील नव्हे, तर देशभरातून अनेक जण त्यांना झाडांच्या आजाराबाबत सांगतात आणि ते त्यावर मोफत उपचार करतात.
झाडे वाचवण्यासाठी त्यांनी वृक्ष आयुर्वेदावर काही पुस्तके लिहिली आहेत. ती आता केरळच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहेत. बिनू सकाळी लाेकांच्या झाडांबाबतच्या आजार ऐकून घेतात आणि नंतर झाडांवर उपचार करतात. त्यांनी नुकतेच उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि कोशांबी येथील अनेक एकरांवरील पेरूच्या बागेत पसरलेला रोग नियंत्रणासाठी मदत केली. बिनू यांनी १५ वर्षांपूर्वी एका अर्धवट जळालेल्या झाडावर उपचार करत त्यावर पालवी आणली तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. नंतर मालायिंचीप्पारा येथील सेंट जोसेफ शाळेची काही मुले त्यांच्याकडे आली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या शाळेत एक आंब्याचे झाड आहे आणि अनेक वर्षांपासून बहरलेले नाही. बिनू यांनी त्यावर उपचार केले आणि तेव्हा त्यास फळे लगडली. तेव्हापासून मुले व लोक त्यांना झाडांचे डॉक्टर म्हणतात.
वाळवीच्या वारुळाची माती, शेण, दूध, तुपाने उपचार
बिनूंच्या मते, वृक्ष आयुर्वेदात सर्व रोगांवर उपचार सांगितलेेले आहेत. त्यात वाळवीच्या वारुळाची माती, धानाच्या शेतातील माती प्रमुख आहेत. शेण, दूध, तूप आणि मध यांचाही वापर केला जातो. केळ्याच्या खुंट्याचा रस आणि म्हशीच्या दुधाचा वापरही होताे. अनेकदा झाडांवरील घावांवर महिनाभर म्हशीच्या दुधाची पट्टी लावावी लागते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.