Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | kesar and manuka water health benefits in Marathi

केसर आणि मणुक्याचे पाणी प्या; पचनक्रिया सुधारा, तणाव दूर करा 

डाॅ. भानु शर्मा | Update - Apr 10, 2019, 12:04 AM IST

मणुक्याचे पाणी यकृतामध्ये बायोकेमिकल प्रोसेस सुरू करते. ज्यामुळे रक्त वेगाने शुद्ध होऊ लागते

 • kesar and manuka water health benefits in Marathi

  मणुका आणि केसर या दोन्हीत अशा गुण आहेत जे कित्येक त्रासाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. याला दुधाशिवाय पाण्यात मिसळून खाणे लाभदायक आहे. येथे जाणून घेऊया, या पाण्यामुळे आरोग्य आणि सौंदर्याला होणाऱ्या फायद्यांविषयी.


  मणुक्याचे पाणी कसे करावे
  एक ग्लास पाणी गरम करा. यात मणुका टाकून रात्रभर ठेवा. सकाळी याला गाळून घ्या आणि प्या.
  गडद रंग निवडा
  हे पाणी बनवण्यासाठी गडद रंगाचे मणुके निवडा. यामुळे जास्त फायदा होईल.


  यकृताची समस्या
  मणुक्याचे पाणी यकृतामध्ये बायोकेमिकल प्रोसेस सुरू करते. ज्यामुळे रक्त वेगाने शुद्ध होऊ लागते. या पाण्यामुळे यकृतासंबंधी आजारांपासून बचाव होतो.


  अॅनिमिया
  या पाण्यामध्ये लोह असते. रक्त निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सही यात असते जे अॅनिमिया दूर करण्यास मदत करते.


  डोळ्यांची दृष्टी
  यात असणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी चांगली करते.ज्यांना रातआंधळेपणा किंवा डोळ्यांचे स्नायू अशक्त आहेत, त्यांनी हे पाणी प्यायल्यास फायदा होतो. हा ताप कमी करण्यास फायदेशीर आहे.


  हृदयाच्या समस्येपासून बचाव
  मणुक्याचे पाणी रोज प्यायल्यास काेलेस्ट्रेराॅलचे प्रमाण संतुलित राहाते. याला हृदयासंबंधी आजार आणि स्किनसंबंधी समस्यांना दूर करण्यासाठीही पिता येऊ शकते.


  केसरचे पाणी कसे करावे
  केसऱ्यांच्या धाग्यांना पाच मिनिटांपर्यंत पाण्यात भिजवून ठेवा. नंतर प्या.


  चहापेक्षा फायदेशीर
  याला कैफिनपेक्षा जास्त असरदार मानले जाते. म्हणून चहाऐवजी याला प्या.


  याचे 4 फायदे
  केस गळणे

  बदलणाऱ्या ऋुतूमुळे गेस गळती सुरू होते. हे कमी करण्यासाठी केसरचे पाणी फायदेशीर आहे. याला दररोज प्यायल्यास केस मजबूत व चमकदार होतात.


  सर्दी-पडशापासून आराम
  केसर हे गरम असल्यामुळे सर्दी-पडसे झाल्यावर प्यावे. जर खूप दिवसांपासून सर्दी-पडसे असेल तर आणि लवकर आराम हवा असेल तर हे पाणी िदवसांतून दोनवेळा पिऊ शकता.


  पचनक्रिया सुधारते
  ज्या लोकांना पचनास समस्या असते, त्यांनी केसराचे सेवन करावे. यामुळे पोटातील दुखणे बरे हाेते आणि पचनकियेच्या प्रक्रियेला मजबूत करण्यास मदत करते.


  उदासीनता दूर करते
  जर तुम्ही उदास राहात असाल तर दररोज केसरचे पाणी पिणे फायदेशीर आहे. याच्या गुणांमुळे याला मूड बुस्टरदेखील म्हटले जाते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून आजारांपासून बचाव होतो.


  कमी प्रमाणात करा वापर
  केसरचा उपयोग नेहमी सीमित प्रमाणातच करा. याच्या जास्त वापराने तोंड सुखते, आळस, भुकेमध्ये बदल आणि डोके दुखण्यासारख्या समस्या होऊ शकते.

Trending