Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | keshar benefits for new born baby in marathi

नवजात बालकासाठी अमृत आहे केशर, होतात हे खास फायदे

हेल्थ डेस्क | Update - Dec 08, 2018, 02:21 PM IST

भारतात केशर फक्त जम्मू आणि काश्मीरच्या जवळपासच्या क्षेत्रात पिकवले जाते. वाचा फायद्यांविषयी

 • keshar benefits for new born baby in marathi

  प्राचीन काळापासून सौंदर्य वाढवण्यासाठी आणि आरोग्यासाठी केशराचा उपयोग केला जातोय. केशर हे उष्ण असते. याचे अनेक आरोग्य फायदे असतात. याला एक वेगळाच सुगंध असतो. भारतात हे फक्त जम्मू आणि काश्मीरच्या जवळपासच्या क्षेत्रात पिकवले जाते. वाचा फायद्यांविषयी...


  नवजात बालकासाठी अमृत
  - नवजात बालकाला सर्दी-पडशाची समस्या होते. हे दूर करण्यासाठी आईच्या दुधात केशर मिसळून त्याच्या नाक आणि कपाळाला मसाज करावी.


  - केशर, जायफळ आणि लवंगेचा लेप बनवून बाळाची छाती आणि पाठीवर लावल्याने फायदा होतो.


  मेंदू चांगला चालतो : केशर चंदनासोबत घासून याचा लेप माथ्यावर लावा. यामुळे डोके, डोळे आणि मेंदूला गारवा मिळतो. याचा लेप लावल्याने मेंदू चांगला चालतो.


  टक्कल दूर : टक्कल दूर करण्यासाठी केशर संजीवनी बुटीप्रमाणे काम करते. ज्या बालकांचे केस मधून उडून जातात. त्यांनी थोडासा ज्येष्ठमध दुधात बारीक करून त्यामध्ये चिमूटभर केशर टाकून पेस्ट बनवा. झोपताना डोक्यावर लावल्याने टकलाची समस्या दूर होते.


  तापामध्ये फायदेशीर : केशरामध्ये क्रिसिन नामक तत्त्व असते. हे वैज्ञानिक रूपात ताप दूर करण्यात उपयोगी मानले जाते. यासोबतच हे एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते.

Trending