Home | National | Other State | Key Suspect Armyman In Bulandshahr Cop Killing Detained from Kashmir

बुलंदशहर: पोलिस अधिकाऱ्याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सैनिकाला काश्मीरातून अटक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:53 PM IST

जीतेंद्र मलिक उर्फ जीतू फौजी असे त्या आरोपीचे नाव आहे.

 • Key Suspect Armyman In Bulandshahr Cop Killing Detained from Kashmir

  लखनौ - बुलंदशहर येथील पोलिस अधिकाऱ्याच्या मॉब लिन्चिंग प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सैनिकाला अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीतेंद्र मलिक उर्फ जीतू फौजी असे त्या आरोपीचे नाव आहे. एका प्रसिद्ध माध्यमाच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेश पोलिस आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तसेच सोपोर जिल्ह्यातून जीतू फौजीच्या म्हुस्क्या आवळल्या आहेत. गेल्या आठवड्यात बुलंदशहर येथे गोहत्या/ तस्करीच्या अफवेनंतर हिंसाचार भडकला होता. तो वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या पोलिस निरीक्षक सुबोध कुमार यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

  पोलिस अधीक्षकांची बदली
  बुलंदशहर हत्या प्रकरणाच्या 6 दिवसानंतर यूपी पोलिस विभागाने शहरातील पोलिस अधीक्षकांची बदली केली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक कृष्ण बहादूर सिंह यांची बदली आता लखनौला करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बुलंदशहरात प्रभाकर चौधरी यांना बोलावण्यात आले आहे. यापूर्वी चौधरी सीतापूर येथे पोलिस अधीक्षक होते.

  एफआयआरमध्येही जवानाचे नाव
  पोलिसांनी सांगितले की, आरोप असलेल्या लष्करी जवानाचे नाव एफआयआरमध्येही आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये लष्करी जवानाकडे कट्टा असल्याचे दिसून आले आहे. याच व्हिडिओच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. गुरुवारी रात्री पोलिसांनी या जवानाच्या चिंगरावठीमधील घरी झडती घेतली.


  गोतस्करीच्या संशयामुळे भडकला हिंसाचार
  बुलंदशहर येथे सोमवारी गोतस्करीच्या मुद्द्यावरून हिंसाचार पसरला होता. याचे नेतृत्व बजरंग दलाचे नेते योगेश राज यांनी याचे नेतृत्व केले होते. पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले आहेत. पहिली एफआयआर योगेश यांच्या तक्रारीवरून गोतस्करीची दाखल केली. त्यात सात जणांची नावे आहेत. तर दुसऱ्या एफआयआरमध्ये हिंसाचार आणि इन्स्पेक्टरच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यात 27 जणांची नावे आहेत तर 60 अज्ञातांचा समावेश आहे. आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे. तर चौघांना ताब्यात घेतले आहे.


  माझ्या मुलाने गोळी घातली असेल तर त्याला गोळी घाला
  आरोपीच्या आईने पोलिसांवर तपासाच्या नावाखाली घरात गोंधळ घातल्याचा आरोप केला आहे. तसेच घरातील महिलांबरोबर गैरवर्तन केल्याचेही म्हटले आहे. माझ्या मुलाने इन्सपेक्टरला गोळी घातली असेल तर त्याला गोळी घाला असे त्यांनी म्हटले आहे.

Trending