आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KG मध्ये शिकणाऱ्या चिमुरड्याला स्वत:चे नाव लिहिता आले नाही, चिडून शिक्षकाने डोळाच फोडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर (यूपी) - KG मध्ये शिकणाऱ्या मुलाला शाळेत स्वत:चे नाव नीट लिहिता आले नाही. यामुळे शिक्षकाला एवढा राग आला की, त्याने चिमुरड्याच्या डोळ्यात पेन घुसवला. रक्त निघाल्यानंतर सुजून मुलाचा डोळा बाहेर आला आहे. ही घटना 25 जुलैची आहे. शाळेचे प्रशासन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आपल्या बाळाला तडफडताना पाहून आईवडिलांना राहावले नाही आणि त्यांनी बुधवारी कलेक्टरांसमोर आपली तक्रार मांडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलाला चांगल्या उपचारांसाठी लखनऊ मेडिकलला रेफर केले आहे.

 

- ही घटना रहीमपूर गावातील आहे. रामसिंह यांचा 7 वर्षीय मुलगा लवकुश 'उर्मिला देवी स्कूल'मध्ये शिकतो. वडील म्हणाले की, शिक्षक उमेश यादवने वर्गात मुलाला त्याचे नाव लिहायला सांगितले. मुलाकडून नाव लिहिण्यात चूक झाली. त्याने लवकुशला बेदम मारहत त्याच्या डोळ्यात पेन घुसवला. यामुळे डोळ्यातून रक्त निघू लागले. मग हळूहळू डोळा सुजून बाहेर आला.


- शाळा प्रशासनाने शिक्षकावर कोणतीही कारवाई न करता मुलावर उपचार करण्याचा विश्वास दिला. मुलाचे कुटुंबीय गरीब आहेत, यामुळे ते तयार झाले. परंतु जेव्हा शिक्षकाला जेव्हा कळले की, उपचारांसाठी खूप खर्च येईल, तेव्हा तो गाव सोडून पळून गेला.


- बुधवारी कुटुंबीय मुलाला घेऊन कलेक्टरांना भेटायला गेले. तेथे अधिकारी न भेटल्याने पोलिसांत गेले. सिटी एसपी दिनेश त्रिपाठी म्हणाले की, गुन्हा दाखल करून मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शिक्षकाला लवकरात लवकर अटक केली जाईल. 

 

बातम्या आणखी आहेत...