आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday : ज्या चित्रपटाने केवळ 2 आठवड्यातच कमवले 200 कोटी, त्याच लीड अॅक्टरचे वडील आजही आहेत बस ड्रायव्हर, अॅक्टरकडे आहे कोटींची प्रॉपर्टी आणि अनेक लग्झरी कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कन्नड फिल्म 'केजीएफ'चे लीड अॅक्टर यश (8 जानेवारी) 33 वर्षांचा झाला आहे. त्याची फिल्म सध्या सगळीकडे धमाल करत आहे. फिल्मने केवळ हिंदीमध्येच 40 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच, ग्लोबल मार्केटमध्ये फिल्मने 200 कोटी रुपये क्लबमध्ये सामील केले आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे की, फिल्मने हिंदी बेल्टमध्ये त्यावेळी कमाई केली आहे ज्यावेळी त्याला टक्कर देण्यासाठी शाहरुखची 'जीरो' आणि रणवीरची 'सिम्बा' मैदानात आहे. फिल्मचे यश पाहू याचा सीक्वल बनवण्याचीही घोषणा केली गेली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक यशचे वडील आजही बस ड्रायव्हर आहे. 

 

फिल्मी नाव आहे यश...
- कर्नाटकमध्ये जन्मलेल्या यशचे खरे नाव कुमार गौडा आहे. त्याने टीव्ही सीरियल नंदा गोकुलपासून आपल्या अभिनयातील करियरला सुरुवात केली. त्याने 2007 मध्ये फिल्म 'Jambada Hudugi' ने डेब्यू केला. मात्र, या फिल्ममध्ये त्याचा सेकंड लीड रोल होता. 

 

बंगळुरूमध्ये आहे 3 कोटींचा बंगला... 
यशने 12 वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये 18 चित्रपटांत काम केले. 40 कोटींची प्रॉपर्टीचा मालक यशकडे बंगळुरूमध्ये 3 कोटींचा एक बंगला आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे ऑडी क्यू 7 (1 कोटी) आणि रेंज रोवर (80 लाख) आहे. यश एका फिल्मसाठी 4 ते 5 कोटी रुपये चार्ज करतो. 

- कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक यशचे वडील अरुण कुमार बस ड्रायव्हर आहेत आणि आजही ते याच प्रोफेशनमध्ये आहेत. बस ड्रायव्हिंग करूनच अरुण यांनी आपल्या मुलाला वाढवले आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. ते या प्रोफेशनला यासाठी सोडत नाहीत कारण याच कामामुळे आज त्यांचा मुलगा या उंचीवर पोहोचला आहे. 'बाहुबली' फिल्मचे डायरेक्टर एसएस राजामौलीने एका इंटरव्यूमध्ये सांगितले, "मला हे ऐकून आश्चर्य वाटले की, यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी इतके काही केले. ते माझ्यासाठी रियल हीरो आहेत. 

 

गर्लफ्रेंडसोबत केले होते गुपचुप लग्न... 
- यशने अभिनेत्री राधिका पंडितसोबत लव्ह मॅरेज केले. दोघांची पहिली भेट सीरियल 'नंदा गोकुल' मध्ये झाली होती. सोबत काम करताना दोघांची मैत्री झली आणि मग त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी गोव्यामध्ये गुपचुप साखरपुडा आणि बंगळुरूमध्ये लग्न केले. रंजक गोष्ट ही आहे की, यशने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कर्नाटकच्या पूर्ण जनतेला इन्वाइट केले होते दोघांना एक मुलगी आहे. 

- 2017 मध्ये यश-राधिकाने मिळून एक यश मार्ग फाउंडेशन सुरु केले आहे. ही संस्था गरजू लोकांना मदत करते. कर्नाटकमधील दुष्काळग्रस्त कोप्पाल जिल्ह्यात यशने या संस्थेमार्फत 4 कोटी रुपये लावून झरे बनवले. जेणेकरून लोकांना पिण्यासाठी स्वच पाणी मिळेल. 

 

नाही केले बर्थडे सेलिब्रेशन...  
यशने साउथ फिल्मचा एक अभिनेता अम्बरीश याचे निधन झाल्यामुळे आपला बर्थडे सेलिब्रेट केला नाही. अम्बरीशचे निधन नोव्हेंबर 2018 मध्ये झाले. 

बातम्या आणखी आहेत...