आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'केजीएफ चॅप्टर 2'चे पोस्टर रिलीज, अभिनेता यशचा दिसला डॅशिंग लूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः दक्षिणेचा सुपरस्टार यशचा चित्रपट 'केजीएफ चॅप्टर 1'ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. या कन्नड चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर ट्विट केले आहे. प्रशांत नील दिग्दर्शित आणि होम्बाले फिल्म्स निर्मित ‘केजीएफ चॅप्टर 2’ हा चित्रपट  2020 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, अनंत नाग आणि मालविका अविनाश यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. 


21 डिसेंबर (2018) रोजी  केजीएफ चॅप्टर 1 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या वर्षपूर्तीचे निमित्त साधत निर्मात्यांनी सिक्वेलचे फर्स्ट लूक पोस्टर जारी केले. पोस्टर शेअर करताना  प्रॉडक्शन हाऊस, होम्बाले फिल्म्सने लिहिले, "एम्पायरचे पुनर्निर्माण! !!! आम्ही येथे जाऊ # केजीएफसीचॅप्टर 2 फर्स्ट लूक "

पोस्टरमध्ये अभिनेता यश अशा लोकांच्या गटाचे नेतृत्व करीत आहे ज्यांनी कोलार गोल्ड फील्डमध्ये वर्षानुवर्षे कष्ट घेतले. तसेच फर्स्ट लूक पोस्टरवर "एम्पायरचे पुनर्निर्माण" असा मथळा आहे, जो चित्रपटाच्या मनःस्थितीला दर्शवतो. यश पुन्हा एकदा रॉकीच्या भूमिकेचे झळकणार असून तो कोलार खाण क्षेत्रातील लोकांचा मशीहा बनतो. सूत्रांच्या माहितीनुसार, केजीएफ चॅप्टर 2  हा चित्रपट जून 2020 मध्ये जगभरात तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये रिलीज होईल. तथापि, निर्मात्यांनी चित्रपटाची अधिकृत तारीख जाहीर केली नाही. यापूर्वीच्या मुलाखतीत अभिनेता यश म्हणाला होता, "या वेळी सादरीकरणाचे प्रमाण खूप मोठे होणार आहे. आता केजीएफ एक मान्यताप्राप्त ब्रँड आहे. असे नाही की आम्ही पहिल्या भागाबद्दल कमी सावध होतो, परंतु आम्ही सिक्वेलमध्ये तांत्रिक बाबींकडे अधिक जातीने लक्ष ठेवले आहे. स्क्रिप्टमध्ये काही अत्यंत कठीण असे अॅक्शन सीक्वेन्स आहेत,  ज्यांच्यासाठी आम्हाला परदेशी तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागली. "

बातम्या आणखी आहेत...