आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'KGF Chapter 2' Movie's First Poster Released, 'Adhira' Role Will Be Released On July 29

'KGF Chapter 2' चित्रपटाचे पहिले पोस्टर झाले रिलीज, 29 जुलैला होणार आहे 'अधीरा' च्या भूमिकेचा खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दक्षिणेचा सुपरस्टार यशचा चित्रपट 'केजीएफ चॅप्टर 1'ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. या कन्नड चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. शुक्रवारी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा दुसरा भाग 'केजीएफ चॅप्टर २'चे पोस्टर रिलीज केले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करून सांगितले की, 'अधीरा' (केजीएफ चॅप्टर 2 'अधीरा') च्या पत्राबद्दल अधिक माहिती 29 जुलैला सकाळी 10 वाजता सांगितली जाईल. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरद्वारे ‘अधीरा’ नावाच्या भूमिकेची लोकांना ओळख करून दिली गेली, ज्यामुळे चित्रपटाबद्दल एक रहस्य निर्माण केले गेले आहे. हे पोस्टर रहस्यमय आणि रंजक आहे. ज्यामध्ये एक बंद मूठ आणि त्यामध्ये गंभीर चेहऱ्याच्या वाघाची प्रतिमा असलेली दिसत आहे, ज्याचा अर्थ दृढ संकल्प, शक्ती आणि संघर्ष असा होतो. यासोबतच असेही सांगितले जात आहे की, चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये संजय दत्त कोणत्यातरी मुख्य भूमिकेत दिसू शकतो. त्यासोबतच विशेष गोष्ट ही आहे की, 29 जुलैला अभिनेत्याचा वाढदिवसदेखील आहे. अशात अंदाज लावले जात आहेत की, 'अधीरा' च्या भूमिकेत तो दिसू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...