आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या तिसऱ्या यादीतही खडसे गायब; शरद पवार म्हणतात, खडसे संपर्कात...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपने गुरुवारी चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यातही एकनाथ खडसे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांची नावे नव्हती. यात काँग्रेसमधून नुकतेच आलेले काशीराम पावरा यांना शिरपूरमधून, रामटेकमध्ये मल्लिकार्जुन रेड्डी, साकाेलीतून राज्यमंत्री परिणय फुके, मालाड पश्चिममधून रमेशसिंह ठाकूर यांची नावे जाहीर करण्यात आली. 
 

शरद पवार म्हणतात, खडसे संपर्कात...]
माझ्या उमेदवारीबाबत पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. पक्ष योग्य निर्णय घेईल. मात्र, मला उमेदवारी का नाही? हे पक्षाने कानात सांगितले तरी चालेल, असे माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, तर एकनाथ खडसे गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यात केला.
 

काँग्रेसने सिल्लाेडचा उमेदवार बदलला
काँग्रेसने १९ उमेदवारांची चाैथी यादी गुरुवारी जाहीर केली. त्यात सिल्लाेडमधील प्रभाकर पालाेदकर यांचे जाहीर केलेले तिकीट रद्द करून कैसर आझाद यांना उमेदवारी दिली, तर नंदुरबारमधून माेहन पवनसिंह यांची उमेदवारी रद्द करून तिथे उदयसिंग पाडवी यांना तिकीट दिले. दक्षिण पश्चिम नागपूरमधून  मुख्यमंत्र्यांच्या विराेधात आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली.

बातम्या आणखी आहेत...