आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 5 वर्षांनी पती करू लागला एकच डिमांड, मग पत्नीला मारून 10 फूट खोल जमिनीत पुरले, 2 मुलेही गायब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खगडिया (बिहार) - येथे सोमवारी पोलिसांनी विवाहितेच्या माहेरच्यांच्या तक्रारीवरून 10 फूट जमीन खोदून मृतदेह हस्तगत केला. विवाहितेला शेतात पुरण्यात आले होते. मृत महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, हुंड्यासाठी सासरच्यांनी हत्या करून तिला पुरले आहे. मृत विवाहितेची दोन मुलेही गायब आहेत.

 

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खगडिया जिल्ह्याच्या मथुरापूरमधील रहिवासी छोटे लाल महतो यांची कन्या रूबीचे 5 वर्षांपूर्वी मनीष मंडल याच्याशी लग्न झाले होते. सासरची मंडळी रूबीला हुंड्यासाठी छळत होती. छोटेलाल म्हणाले- मुलीच्या दिरोन फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीला मारून गाडून टाकले आहे, आता जे करायचे ते करा... पोलिसांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आला. पोलिस अधिकारी दीपक कुमार म्हणाले- रूबीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.


चुलत भावाने शोध घ्यायला सुरुवात केली, तेव्हा कळली घटना...
रूबीचा चुलत भाऊ कुंदनने सांगितले, रविवारी सकाळपासूनच रूबीशी संपर्क होत नव्हता. मृत रुबीचा सासरा शंकर सांगत होता की, ते बाहेर आहेत. घरी गेल्यावर बोलणे करून देऊ. सकाळी फोन लावला तर सर्वांचा नंबर बंद येत होता. घरी कुणीच नसल्याचा संशय आला. यानंतर आम्ही पोलिसांसेाबत मिळून रात्रभर शोधाशोध केली. चौकशी कळले की- सासरच्या मंडळींनी रुबीची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत पुरून ठेवला आहे.


हुंड्यात मागत होते सेने अन् नगदी 50 हजार...
मृत रुबीचा चुलत भाऊ कुंदनने सांगितले की, रुबीच्या सासरच्या मंडळींनी नुकतीच सोन्याची चेन, एक बाइक आणि 50 हजार रुपये रोख मागितले होते. पण गरिबीमुळे एवढे सर्व काही द्यायला आम्ही असमर्थ होतो. वडील म्हणाले- मुलीच्या सासरच्या मंडळींनी एवढे सर्व देण्यासाठी वेळ मागितला होता. पण यादरम्यान त्यांनी हत्या करून टाकली. ते म्हणाले की, एक नातू राजन 3 वर्षे आणि दुसरा रजनीश 1 वर्षाचा आहे. हुंड्याच्या लोभापायी या माणसांनी त्यांचीसुद्धा हत्या केली असेल.

 

बातम्या आणखी आहेत...