आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरवे धरण फुटल्याची अफवा; धरण लिक नसून उजवा कालवा लिक, ग्रामस्थांनी घाबरू नये- जलसंपदा विभाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- तालुक्यातील खैरवे धरण लिक नसून उजवा कालवा येथील विमोचक जवळ लिक असल्याने मोठे भगदाडे पडल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. सकाळी 9 वाजेपासून धरणाच्या कालव्याचा जवळ लिक सुरू आहे. काही वेळात तेथील मातीचा भाग खचला. मोठे भगदाडे पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात गावातील सरपंच व ग्रामस्थांनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास संबंधित जलसंपदा विभागाचे अभियंते यांना संपर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले परंतू त्यांनी लवकर न येता रात्री उशीराने पाहणी केली. खैरवे धरण फुटल्याच्या अफवेने नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा, आसलीपाडा, आंबाफळी, बोरचक, शेगवे गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहे. उजव्या कालव्याच्या विमोचक जवळ लिक झाल्याने आसपासच्या परिसरातील शेतात पाणी गेले आणि पीक मालाचे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार परिसरात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे खैरवे लघू प्रकल्पात पाणी आल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. खैरवे धरण 2002 ला बांधण्यात आले, प्रत्यक्षात पाणी आडव्यासाठी 2005 पासून सूरवात झाली. धरणाचा सांडव्या कडील भरावाचा भाग ढासळला असून पाटचारीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
धरणालगत असलेल्या शेतांमधे पाणी शिरले असून, अंधार असल्याने नेमके किती नूकसान झाले ते सांगता येत नाही. अशी माहिती ग्रामस्थ दिनेश गावीत यांनी दिली. प्रसंगी ग्राम सेवक देविदास चौरे व ग्रामस्थांची उपस्थितीत होते. रात्री उशीरापर्यंत धरणाच्या दुरूस्तीची काम 5 जेसीबीने सुरू होते. अंधार व रिमझिम पाऊस सुरू असल्याने दुरूस्ती करण्यास अडचण येत आहे. दरम्यान, धरण सुरक्षित आहे, घाबरण्याचे काहीही कारण नाहीये. सध्या कालवा बंद करण्यात आला आहे. धरणाचा उजव्या कालव्या विमोचक नादुरुस्त झाल्याने लिक झाले. दुरूस्ती काम सुरू केले आहे. ग्रामस्थांनी घाबरू नये. धरणाला कोणताही धोका नाही असे सहाय्यक अभियंते 
सुमन गावित यांनी माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...