Home | International | Other Country | khalistan-supporters-interrupt-rahul-gandhi-event-in-london

७० वर्षांत काहीच झाले नाही म्हणणे हा तर लाेकांचा अपमान : राहुल गांधीं यांची टीका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 27, 2018, 07:11 AM IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी विदेश दौऱ्यावर आहेत. रविवारी ते लंडनमध्ये अनेक कार्यक्रमांत सहभागी झाले.

 • khalistan-supporters-interrupt-rahul-gandhi-event-in-london

  लंडन- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी विदेश दौऱ्यावर आहेत. रविवारी ते लंडनमध्ये अनेक कार्यक्रमांत सहभागी झाले. तेथे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारवर अनेक आरोप केले. राहुल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, भारतीय रिझर्व्ह बँक यांसारख्या ज्या संस्था आपल्या देशाच्या स्तंभ आहेत त्यांचे अवमूल्यन केले जात आहे. आपल्याला काम करू दिले जात नाही, असे पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या ४ वरिष्ठ न्यायमूर्तींना जाहीरपणे सांगावे लागले. गेल्या ७० वर्षांत काहीच झाले नाही, असे म्हणून पंतप्रधान काँग्रेसवर टिप्पणी करत नाहीत, तर ते देशातील प्रत्येक व्यक्तीचाच अपमान करत आहेत. भारत जगाला भविष्याचा मार्ग दाखवतो. भारताच्या लोकांनी लोकशाही यशस्वी करून दाखवली आणि त्यात काँग्रेसने मदत केली आहे.


  राहुल गांधींच्या कार्यक्रमात खलिस्तान समर्थकांच्या घोषणा
  शनिवारी राहुल यांच्या कार्यक्रमात तीन खलिस्तान समर्थक घुसले आणि खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. काही लोकांनी काँग्रेस जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर काढले.


  हक्क : मागास, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याकांना केली जातेय मारहाण
  राहुल गांधी यांनी आरोप केला की, सध्याच्या भाजप सरकारच्या नेतृत्वाखालील रालोआच्या राजवटीत भारतात दलित, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरिबांना सांगितले जाते की, तुम्हाला काही मिळणार नाही. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना मारहाण केली जाते. अॅट्रॉसिटी कायदा संपुष्टात आणला जात आहे आणि शिष्यवृत्त्याही बंद करण्यात आल्या आहेत.


  भ्रष्टाचार : नीरव मोदी पैसे घेऊन झाला फरार
  राहुल म्हणाले की, आज भारतात लोकांशी जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात आहे. पंतप्रधानांच्या पक्षाच्या आमदाराने महिलेवर अत्याचार केला आणि नीरव मोदी जनतेचा पैसा घेऊन पळून गेला तेव्हा मोदी गप्प बसले. मी पंतप्रधानांबद्दल वाईट भाषा वापरत नाही. पण राफेल करारावर संसदेत माझ्या प्रश्नांची उत्तरेही दिली नाहीत.


  युवक : बेरोजगारीवर चर्चाच होत नाही
  काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले की, चीन दररोज ५० हजार नोकऱ्या निर्माण करतो, तर भारतात दररोज फक्त ४५० लोकांना नोकरी मिळते. देशात बेरोजगारी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील शेतकऱ्यांना मदत हवी आहे. युवकांना शिक्षण, ज्येष्ठांना आरोग्य सेवा हवी; पण शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य सेवांशी संबंधित मुद्द्यांवर देशात कुठलीही चर्चा केली जात नाही. या मुद्द्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.


  आरोप : विजय मल्ल्या पळून जाण्याआधी भाजपच्या अनेक नेत्यांना भेटला होता
  राहुल यांनी शनिवारी रात्री उशिरा लंडनमध्ये भारतीय पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी आरोप केला की, भारत सोडून जाण्यापूर्वी विजय मल्ल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटला होता. त्याची कागदपत्रेही आहेत. मात्र, त्यांनी नावे सांगितली नाहीत. राहुल म्हणाले की, नीरव-राहुल यांच्याशी पंतप्रधानांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई झाली नाही.

 • khalistan-supporters-interrupt-rahul-gandhi-event-in-london
 • khalistan-supporters-interrupt-rahul-gandhi-event-in-london

Trending