आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव वन्यजीव परीक्षेत्रात झाले वाघाचे दर्शन, ज्ञानगंगा अभयारण्यात आलेला 'सी1-वाघ' अखेर ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव - जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मागील 1 डिसेंबर पासून सी-1 नावाचा पट्टेदार वाघ आलेला असून या वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वन्यजीव विभाग लक्ष ठेवून आहे. अखेर खामगाव वन्यजीव परीक्षेत्रात वाघाचे दर्शन झाले असून ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मागील 1 डिसेंबरच्या रात्री ज्ञानगंगा अभयारण्यात अभ्यारण्यात सी-1 नावाचा वाघ दाखल झाला. रेडिओ कॉलर लावलेला सदर वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभ्यारण्यातून निघीन तब्बल 5 महिन्यात 1300 किलोमीटरचा प्रवास करत ज्ञानगंगा अभ्यारण्यात आलेला आहे.सी-1 वाघाच्या या जंगल प्रवेशाने अकोला वन्यजीव विभाग सतर्क झालेला असून आवश्यक त्या पाऊले उचलली जात आहे. सी-1 वाघाच्या प्रवेशाने बुलडाणा जिल्ह्यातील व्याघ्र समितीची बैठक नुकतीच पार पडली होती. सी-1 वाघाच्या शोधार्थ ज्ञानगंगा अभयारण्यात ट्रॅप कॅमेरे वाढविण्यात आले होते. बुलडाणा व खामगाव वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी या वाघाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या आगमनाने ज्ञानगंगा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...