आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'Khan Family Does Not Like Salman Katrina's Friendship', Is This A Rumour Or Truth!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'खान कुटुुंबाला खटकत आहे सलमान-कतरिनाची मैत्री...' ही अफवा की सत्य !

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कतरिना कैफ आणि सलमानची मैत्री त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडते. चाहत्यांनी अनेक चित्रपटात त्यांना एकत्र पाहिले आणि पुढेही पाहु इच्छित आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबाविषयी बोलायचे झाले तर आता खान कुटुंबाला सलमान आणि कतरिनाची मैत्री सलू लागली आहे. यामागचे कारण कुणालाच माहित नाही मात्र सलमानच्या बर्थडे पार्टीत आणि अलवीराचा मुलगा अयानच्या माहितीपटाच्या स्क्रिनिंगमध्येही कतरिना कुठेच दिसली नाही. यात पूर्ण खान कुटुंब उपस्थित होते मात्र कतरिना नव्हती. नाही तर कतरिना खान कुटुंबाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हायची. मात्र आता ती कोणत्याही कार्यक्रमात सलमान किंवा त्यांचे कुटुंब गेल्यावर जाते. या मागचे कारण ती किंवा सलमानच सांगू शकतो.