आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाशोगी हत्या: सौदी अरेबियाच्या पाच अधिकाऱ्यांना फाशी शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध - सौदी अरेबियाच्या वंशाचे अमेरिकी पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येत सहभागी सौदी अरेबियाच्या पाच अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा हाेऊ शकते. याप्रकरणी सौदी अरेबियाने एकूण २१ जणांना अटक केली आहे. यामध्ये ११ जणांविरुद्ध आरोप निश्चित झाले आहेत. इतरांची चौकशी सुरू आहे. सौदी अरेबियाच्या तपासकर्त्यांनी प्रथमच खाशोगींच्या हत्येवरून हा खुलासा केला आहे. अशा पद्धतीच्या सौदी अरेबियाने पहिल्यांदाच हत्येत आपल्या अधिकारी सहभागी असल्याचे मान्य केले आहे. एका दिवसापूर्वी तुर्कस्तानने हत्या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली होती.

 
वकिलांनी सांगितले की, हत्येच्या कटात क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांची कोणतीही भूमिका नाही. त्यांना यासंदर्भात माहिती नाही. तपासकर्त्यानुसार गुप्तचर विभागाचे उपप्रमुख जनरल अहमद अल-असिरी यांनी खाशोगींना देशात आणण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात खाशोगींशी चर्चा करण्याऱ्या चमूचे प्रमुख इस्तंबुल दूतावासात गेले व त्यांनी तिथेच खाशोगींच्या हत्येचा आदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...