आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Khata Of Flowers Of 12 Thousand Feet High Open For Visitors; Treasures Of More Than 500 Species Of Rare Flowers

१२ हजार फूट उंचीवरील फुलांचे खाेरे पर्यटकांसाठी झाले खुले ; दुर्मिळ फुलांच्या ५०० पेक्षा जास्त प्रजातींचा खजिना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपेश्वर/चमोली - उत्तराखंडच्या चमाेलीमध्ये १२,५०० फूट ऊंचीवरील फुलांचे खाेरे शनिवारी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. हे खाेरे ३१ आॅक्टाेबरपर्यंत खुले राहणार आहे.  पहिल्या दिवशी २७ पर्यटकांनी या खाेऱ्याचे दर्शन घेतले.यामध्ये पाच विदेशी पर्यटक हाेते. गेल्या वर्षी येथे विक्रमी १४ हजार पर्यटकांनी भेट दिली. हे खाेरे व्हॅली आॅफ फ्लाॅवर्स नावाने प्रसिध्द आहे. 

नंदा देवी नॅशनल पार्क अंतर्गत येणारे हे खाेरे ८७.५ चाैरस कि.मी परिसरात आहे. जैविक विविधतेमुळे २००५ मध्ये याला यूनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घाेषित केले हाेते. २० वेळा खाेऱ्याला भेट दिलेले लेखक संजय चाैहान म्हणतात, येथे फुलांच्या ५०० पेक्षाजास्त जाती आहेत. 


१५० रुपये द्यावे लागते प्रवेश शुल्क 
येथे जुलैैच्या पहिल्या आठवड्यापासून आॅक्टाेबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत विविध प्रकारची फुले फुलतात. येथे रस्तामार्गाने गाेविंद घाटपर्यंत पाेहचता येते. येथून १४ कि.मी अंतरावर घांघरिया असून त्याची उंची ३,०५० मीटर आहे. येथे लक्ष्मण गंगापुलावरून तीन कि.मी अंतरावर फुलांचे खाेरे आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रती व्यक्ती १५० रुपये आणि लहान मुलांसाठी ७५ रुपये या प्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाते.


ब्रह्मकमळ आणि ब्ल्यू पॉपीची फुलेही आहेत
खाेऱ्यात ३०० प्रजातींची फुले वेगवेगळ्या वेळी फुलतात. येथे जैव विविधतेचा खजिना आहे. येथे पोटोटिला, प्राइमिला, अॅनिमॉन, अरीसिमा, अॅमोनीटॅम, ब्लू पाॅपी, मार्स मेरी गोल्ड, ब्रह्म कमळ, फॅन कमळ सारखी अनेक फुले उगवतात. दुर्मिळ जातीचे किटक, जीव-जंतू, वनस्पती, आैषधी वनस्पती आहेत. 

बातम्या आणखी आहेत...