Home | Maharashtra | Vidarva | Akola | Khatri massacre; Hearing completed

खत्री हत्याकांड; सुनावणी पूर्ण, ११ सप्टेंबरला निकाल!

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 12:59 PM IST

शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडाची अंतिम सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. पुढील तारीख ११ सप्टेंबर रोजी ठेव

  • Khatri massacre; Hearing completed

    अकोला- शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडाची अंतिम सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. पुढील तारीख ११ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. या दिवशी निकाल येण्याची शक्यता आहे.


    सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २०१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून, धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या केली होती. या हत्याकांड प्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाने विशेष सरकारी विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. या हत्याकांड प्रकरणात सरतपासणी व उलटतपासणी पूर्ण झाली. सोमवारी अंतिम सुनावणी पार पडली. आरोपी पक्षाच्या वतीने सरकार पक्षाने केलेले आरोप फेटाळण्यात आले. डिसेंबर २०१७ पासून या प्रकरणात आरोपींच्या व सरकार पक्षाकडून साक्षीदार तसेच तक्रारकर्त्यांची तपासणी व उलट तपासणी करण्यात येत आहे.


    यामध्ये दिल्ली येथील बांधकाम व्यावसायिक प्रवीणसिंग कुशवाह आणि सोमठाणाचे पोलिस पाटील किशोर दुतोंडे यांच्यासह प्रत्यक्ष साक्षीदार रवी दुतोंडे यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर गृह खात्याचे सचिव यांचीही साक्ष न्यायालयाने तपासली. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलिस कर्मचारी गजानन थाटे यांची साक्ष जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वीच तपासली. या प्रकरणाचा निकाल ११ सप्टेंबर रोजी येण्याची शक्यता आहे. आरोपी पक्षाच्या वतीने अॅड. वसिम मिर्झा, अॅड. दिलदार खान, अॅड. हातेकर यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकिल अॅड. उज्ज्वल निकम, जिल्हा सरकारी वकिल अॅड. आर.आर. देशपांडे यांनी काम पाहिले.

Trending