• Home
  • Sports
  • Khelo India championship arrange in Ladakh, Jammu and Kashmir

खेलो इंडिया / दाेन महिन्यांत तिसरी खेलाे इंडिया स्पर्धा; लडाख, जम्मू-काश्मिरात आयाेजन, अडीच हजार खेळाडू

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून पहिल्या खेलाे इंडिया व्हिटर गेम्सची घाेषणा, आता नव्याने स्पर्धेचे आयाेजन 

दिव्य मराठी

Feb 14,2020 09:02:00 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देशातील क्रीडा क्षेत्राच्या प्रगती आणि विकासासाठी नव्याने विविध याेजना हाती घेतल्या जात आहे. याचाच भाग म्हणून देशामध्ये युवांसाठी सुरू करण्यात आलेली खेलाे इंडिया गेम्स ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली. याशिवाय तिसऱ्या सत्रातील या स्पर्धेच्या आयाेजनातून ही माेहीम फत्ते झाल्याचे दिसून आले. याच दृष्टिकाेनातून आता क्रीडा मंत्रालयाच्या वतीने पुन्हा एकदा खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठीची माेहीम हाती घेण्यात आली. यातूनच आता केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी पुढाकार घेतला.


आता देशामध्ये पहिल्यांदा खेलाे इंडिया व्हिंटर गेम्स स्पर्धेचे आयाेजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा लडाख आणि जम्मु -कश्मिरात आयाेजित केली जाईल,अशी घाेषणा क्रीडा मंत्री रिजिजू यांनी गुरुवारी केली. यातूनच आता पहिल्यांदाच हाेत असलेली ही स्पर्धा या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात लडाख येथे हाेईल. त्यानंतर या स्पर्धेचे आयाेजन ७ मार्चपासून जम्मु-काश्मिरात हाेणार आहे, अशी माहिती यादरम्यान रिजिजू यांनी दिली.

लडाख येथे आयाेजित स्पर्धेत तीन खेळांसाठी १७०० खेळाडूंना मिळेल संधी


लडाख येथे आयाेजित करण्यात आलेल्या पहिल्या सत्रातील स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच घाेषित केले जाणार आहे. याठिकाणी हाेणारी ही स्पर्धा ब्लाॅक, जिल्हा आणि केंद्रशासित प्रदेशाच्या पातळीवर आयाेजित केली जाणार आहे. यामध्ये तीन खेळ प्रकारांचा समावेश आहे. यासाठी देशभरातील १७०० खेळाडू आपले काैशल्यपणास लावणार आहेत. याच्या माध्यमातून युवा खेळाडूंमधील गुणवत्तेला चालना मिळेल. तसेच त्यांना वेगळी कामगिरी करण्यासाठी हे माेठे व्यासपीठ तयार झाले आहेे, अशी प्रतिक्रीया क्रीडा मंत्री रिजिजू यांनी दिली.


जम्मू-काश्मिरातील आयाेजित स्पर्धेसाठी १ काेटीचे बजेट

जम्मू-काश्मीर येथे ही िहवाळी स्पर्धा आयाेजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा या ठिकाणी ७ ते ११ मार्चदरम्यान पार पडेल. यासाठी गुलमर्गच्या तीन ठिकाणांची निवड करण्यात आली. या स्पर्धेच्या आयाेजनासाठी क्रीडा मंत्रालयाच्या वतीने भरीव अशी आर्थिक मदत करण्यात आली आहे. याची घाेषणाही क्रीडामंत्र्यांच्या वतीने करण्यात आली. या स्पर्धेसाठी १ काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. याशिवाय यामध्ये वाढ झाल्यास, तशी मदतही करण्यात येणार आहे, असेही क्रीडा मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे . ठिकाणी हाेणाऱ्या स्पर्धेसाठी आतापर्यंत १६ राज्यातील ११०० खेळाडूंनी आपली नाव नाेंदणी केली आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, मणिपूर, आेडिशा, झारखंड, उत्तराखंड, महाराष्ट्र, चंदिगड, उत्तर प्रदेशाच्या खेळाडूंचा समावेश आहे.या 10 खेळांतील इव्हेंटचा समावेश


अल्पाइन स्कीइंग, स्नो रग्बी, आइस स्टॉक स्पोर्ट, स्नो बेस बॉल, आइस हॉकी, आइस स्केटिंग, क्रॉस कंट्री स्कीइंग, स्नोशूइंगमध्ये पुरुष आणि महिला सहभागी हाेतील. स्नो बोर्डिंग, स्नो डर्बी, स्काय सायकलींगमध्ये फक्त पुरुष सहभागी हाेतील.


या वयाेगटातील खेळाडूंना संधी


स्कीइंग स्पर्धेसाठी १३-१४ वर्ष, १५-१६ वर्ष, १७-१८ वर्ष आणि १९-२१ वर्षाखालील महिला आणि पुरुषांचा समावेश असेल. तसेच स्नाे रग्बी आणि स्नाे बेसबाॅल सिनिअर पुरुष आणि महिलाचा समावेश असेल. या वयाेगटातील युवा खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.


केंद्रशासित प्रदेश दर्जा मिळाला, तीन राष्ट्रीय स्पर्धांचे आयाेजन


जम्मू-काश्मीला आता केंद्र शासित प्रदेशचा दर्जा मिळाला. यानंतर या ठिकाणी पर्यटनापाठाेपाठच क्रीडा क्षेत्रालाही चालना मिळत आहे. यातूनच या ठिकाणी तीन राष्ट्रीय स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. यामध्ये टेनिस,बुद्धिबळ आणि वुशुचा समावेश आहे.

X