आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुवाहाटी - युवा खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राच्या संघाने तिसऱ्या सत्राच्या खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये पदकांचे शतक साजरे केले. स्पर्धेत १०७ पदकांची कमाई करून शतक पूर्ण करणारे महाराष्ट्र हे यंदा पहिलेच राज्य ठरले आहे. याच्या बळावर महाराष्ट्राने पदकतालिकेतील आपले वर्चस्व कायम ठेवले. हरियाणा संघ ६७ पदकांचा दुसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्राच्या पूजा दानोळेने आज ५ कि.मी. स्क्रॅच शर्यत ८ मिनिटे ४४.७० सेकंदात वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर तिला १७ वर्षांखालील गटात सांघिक स्प्रिंट प्रकारात आदितीसह कांस्यवर समाधान मानावे लागले. त्यांनी ५४.७१ सेकंद अशी वेळ दिली. मुलांच्या अभिषेक, मयूर पवार, अश्विन पाटील यांनी १ मिनिट ०६.०९२ सेकंदांसह सुवर्णपदक मिळविले. पाठोपाठ शशिकला आगाशे व मयूरी लुटेने ४९.७३६ सेकंद वेळासह सोनेरी यश मिळविले. महाराष्ट्राला आज मयूरी लुटे हिने ५०० मीटर टाइम ट्रायल शर्यतीत रौप्य जिंकले.
आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून पूजावर काैतुकाचा वर्षाव
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गाेल्डन हॅट््ट्रिक साजरी करणाऱ्या पुजा दानाेळेवर काैतुकाचा वर्षाव केला. तीन सुवर्णपदके मिळविल्याचे समजल्यावर त्यांनी तिचे कौतुक करताना आवर्जुन तिच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रातून कुठून आलीस, घरी कोण आहे, आई-वडील काय करतात असे विचारल्यावर त्यांनी तुझ्याबरोबर आई-वडिलांचेही अभिनंदन करायला हवे असे सांगितले व भेटल्यावर त्यांना माझा नमस्कार सांग, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकच्या दुर्गाला कांस्यपदक
मुलींच्या २१ वर्षांखालील १०० मीटर्स अडथळा शर्यतीत वैष्णवी यादव, दुर्गा देवरे, कीर्ति भोईटे व निधी सिंग यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राला ४ बाय ४०० मीटर्स रिलेत कांस्यची कमाई केली. त्यांनी हे अंतर ३ मिनिटे ५४.२० सेकंदांत पूर्ण केले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटातही महाराष्ट्राने ४ बाय ४०० मीटर्स रिलेत कांस्यपदक मिळविले. ही शर्यत ३ मिनिटे २१.६८ सेकंदांत पार करणाऱ्या महाराष्ट्र संघात चैतन्य होलगरे, प्रकाश गडदे, प्रसाद अहिरे, मेंडीस यांचा समावेश होता. प्रांजली पाटील व प्रियाने अनुक्रमे राैप्य, कांस्यपदक पटकावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.