आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Khemchand Chandrani Going For 1,100 Km Cycling From Amreli To Delhi For Wishing The Prime Minister

१,१०० किमी सायकल चालवत अमरेलीहून दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - गुजरातमधील अमरेलीचे भाजप कार्यकर्ते खेमचंद चंद्राणी बुधवारी  १७ दिवस सायकल चालवून सुमारे १,१०० किमी दूर दिल्लीला पाेहाेचले. तेथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन लाेकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला विजय ४२ दिवसांनंतर अनाेख्या पद्धतीने साजरा करून त्यांना त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. याबाबत चंद्राणी यांनी सांगितले की,  नुकत्याच पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीत भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास सायकलवरून अमरेली ते दिल्लीपर्यंत जाऊन पीएम माेदी व गृहमंत्री शहांना शुभेच्छा देण्याचा संकल्प मी केला हाेता. ताे पूर्ण झाल्याचा आनंद आहे.

 

चंद्राणींची नम्रता व उत्साह पाहून प्रभावित झालाे : माेदी
पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चंद्राणींची भेट व सायकल प्रवासाचे छायाचित्र शेअर करून लिहिलेय की- अमरेलीच्या खेमचंदभाईंना भेटलाे. त्यांच्या या प्रवासाने अनेकांना प्रेरणा मिळालीय. मी त्यांची नम्रता व उत्साह पाहून खूप प्रभावित झालाेय. दरम्यान, चंद्राणी हे शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून, त्यांनाही विजयाच्या शुभेच्छा देणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...