Home | News | Khesari and Rani Chatterjee Back Stage dance rehearsal Video on The Kapil Sharma Show

कपिलच्या शोमध्ये पडद्यामागे अशी होती रिहर्सल, भोजपुरी अक्ट्रेसने शेअर केला व्हिडिओ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 01:21 PM IST

'नून रोटी खाएंगे' गाण्यावर थिरकताना दिसली राणी चॅटर्जी

  • Khesari and Rani Chatterjee Back Stage dance rehearsal Video on The Kapil Sharma Show

    मुंबई - भोजपुरी सुपरस्टार निरहुआ, खेसारीलाल, राणी चॅटर्जी आणि आम्रपाली दुबे नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये गेले होते. या सर्व कलाकारांनी कपिल आणि त्यांच्या टीमसोबत चांगला आनंद लुटला. यावेळी निरहुआ आणि खेसारी यांनी आपले जुने अनुभव शेअर केले तर आम्रपाली दुबे आणि राणी चॅटर्जी यांनी डान्स करत प्रेक्षकांची मने जिंकली. राणी चॅटर्जीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती खेसारीसोबत 'नून रोटी खाएंगे' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.


    'बिहाइंड द कपिल शर्मा शो' असे लिहित राणीने व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये कपिलच्या 'शो'ची पडद्यामागील तालिम दर्शवत आहे. राणीने व्हिडिओ शेअर करत शोच्या शुटिंगदरम्यान कलाकार कशाप्रकारे एन्जॉय करतात हे दाखवले. व्हिडिओमध्ये राणी आणि खेसारी डान्सची तालीम करताना दिसत आहेत. एका कोरियोग्राफर त्यांना तालिम देताना दिसून येत आहे.

Trending