आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kदhli, Bumrah In Wisden's T 20 Team Of The Decade; India's Dhoni Was Dropped From The Team

काेहली, बुमराह विस्डेनच्या दशकातील टी-२० संघात; भारताच्या धाेनीला संघातून वगळले

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

लंडन - विस्डेनने या दशकातील आपल्या टी-२० संघाची साेमवारी घाेषणा केली. या संघात टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीसह वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आला. दुसरीकडे भारताला २००७ मध्ये टी-२०चा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धाेनीला या संघातून वगळण्यात आले. आॅस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकाच्या संघाचा कर्णधार अॅराेन फिंच आता विस्डेनच्या टीमचे नेतृत्व करणार आहे. फिंच हा विस्डेनच्या टी-२० टीम ऑफ द डिकेडचा कर्णधार आहे. याशिवाय संघामध्ये आॅस्ट्रेलियाच्या शेन वाॅटसन आणि ग्लेन मॅक्सवेलचाही समावेश आहे. 

अफगाणिस्तानच्या रशीद खान आणि माे. नबीला या संघात स्थान मिळवता आले आहे. आयसीसीच्या कसाेटी आणि वनडेच्या क्रमवारीतील नंबर वन काेहलीला यापूर्वी आॅस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या संघात सहभागी केले हाेते.  विस्डेनने बुमराहवर काैतुकाचा वर्षाव केला. ‘बुमराह हा गुणवंत आहे. त्याची सत्रातील कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने डेथ ओव्हरमध्ये ७.२ इकाॅनाॅमी रेटने गाेलंदाजी केली. ही त्याच्या सातवी सर्वाेत्तम कामगिरी नाेंद झाली.

अशी आहे टी-२० टीम: 


अॅराेन फिंच (कर्णधार), कोलिन मुनरो, विराट कोहली, शेन वाॅटसन, ग्लेन मॅक्सवेल, जोस बटलर, मोहमंद नबी, डेव्हिड  विले, रशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.