आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 व्या वर्षीच देशासाठी नीडरपणे फासावर लटकला होता हा क्रांतीकारक, जन्मतःच आईने विकले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे पहिले क्रांतीकारण म्हणून खुदीराम बोस यांना ओळखले जाते. 11 ऑगस्ट रोजी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ते देशासाठी हसत-हसत फासावर लटकले होते. ते शहीद झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नवी गती आणि शक्ती मिळाली होती. 

 

बंगालच्या मिदनापूरमधील हबीबपूर गावात 3 डिसेंबर 1889 ला बोस यांचा जन्म झाला होता. ते अगदी लहान असतानाच त्यांनी आई वडील गमावले होते. त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना लहानाचे मोठे केले. बंगालचे विभाजन 1905 मध्ये झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य  संग्रामात उडी घेतली होती. ते रेव्हल्युशन पार्टीचे सदस्य होते. त्यांच्याबाबत काही खास तथ्ये आपण आज जाणून घेणार आहोत. 

 

>> वयाच्या 18 व्या वर्षी फाशी
खुदीराम बोस हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सर्वात तरुण क्रांतीकारकांपैकी एक होते. पंधराव्या वर्षीच त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती. तर अवघे 18 वर्षे 8 महिने वय असताना त्यांना ब्रिटीशांनी फासावर लटकावले होते. 

 

>> मोठ्या बहिणीला विकले..

खुदीराम बोस यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या आई वडिलांना दोन मुले झाली पण ती जन्मतःच दगावली. त्यामुळे खुदीराम यांच्या जन्मानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना वाचवण्यासाठी त्यांना मोठ्या बहिणीला तीन ओंजळ धान्याच्या मोबदल्यात खुदीराम यांना विकले होते. बाळाचा कमी वयात मृत्यू होऊ नये म्हणून हा विधी होता. त्याकाळी याला खुद असे म्हटले जायचे. त्यामुळेच बाळाचे नावही खुदीराम ठेवले. खुदीराम बोस सात वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांचे पालन पोषण केले. 

 

>> 15 व्या वर्षी स्वातंत्र्य लढ्यात उडी

मिदनापूरमध्ये श्री ऑरोबिंदो आणि सिस्टर निवेदीता यांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अगदी कमी वयात 15 व्या वर्षी  त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले होते. त्यावेळी वंदे मातरमचे पोस्टर वाटताना त्यांना अटक करण्यात आली होती. पण कमी वय असल्याने ब्रिटीशांनी त्यांना समज देऊन सोडले. 

 

>> किंग्सफोर्ड यांच्या हत्येचा कट
कलकत्ता प्रांताचे चीफ मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड यांच्या हत्येचा कट रचण्यात खुदीराम बोस यांचा सहभाग होता. किंग्सफोर्ड क्रूर शिक्षा देण्यासाठी प्रसिद्ध होता. खुदीराम बोस आणि एका सहकाऱ्याने त्यांच्या हत्येसाठी त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवले. हत्या ठरली त्यादिवशी ज्या बग्गीत किंग्सफोर्ड जाणार होता, त्यात त्यांची पत्नी आणि मुलगी बसली. त्यांचा चेहरा बोस यांना ओळखता आला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बग्गीवर हल्ला केला आणि दोघी यात मारल्या गेल्या. किंग्सफोर्ड मेला हे समजून खुदीराम बोस पळून गेले. पण त्यांना पुसा रोड रेल्वे स्टेशनवर अटक झाली. पुढे या स्टेशनला बोस यांचे नाव देण्यात आले आहे. 

 

>> पाच दिवसांत सुनावली फाशी..
खुदीराम बोस यांना अटक झाली. पाच दिवसांत त्यांच्या खटला चालवण्यात आला आणि त्यांना शिक्षा झाली. त्यावेळी कोर्टात हसत ते म्हणाले, तुम्ही जर मला वेळ दिला तर मी तुम्हाला बाँब कसा तयार करायचा हे शिकवेल. 

 

>> अन् फाशी झाली..

अखेर 11 ऑगस्ट 1908 रोजी मुजफ्फरपूर तुरुंगात खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली. नंतर पुढे या जेलला खुदीराम बोस मेमोरियल सेंट्रल जेल असे नाव देण्यात आले.  Khudiram Bose Memorial Central Jail

 

 

बातम्या आणखी आहेत...