Home | News | Khushi Kapoor Clicks The Diwali Feeding Picture With Boney And Janhvi In Frame

श्रीदेवीशिवाय बोनी कपूरची पहिली दिवाळी, या भावूक फोटोमध्ये लेक जान्हवीला हाताने जेवण भरवताना दिसले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 03:37 PM IST

- बरोबर 10 वर्षांपुर्वी म्हणजेच 2008 मध्ये दिवाळीच्या दिवशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा एक फोटो खुप व्हायरल झाला होता.

 • Khushi Kapoor Clicks The Diwali Feeding Picture With Boney And Janhvi In Frame

  मुंबई. बोनी कपूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये ते थोरली मुलगी जान्हवी कपूरला आपल्या हाताने जेवण भरवताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार दिवाळीच्या निमित्ताने धाकटी लेक खुशी कपूरने हा फोटो काढला आहे. बोनी आणि जान्हवी घरातील डायनिग टेबलवर एकमेकांना पनीरची एक डिश घाऊ घालताना दिसत आहेत. कपूर कुटूंबियांची ही श्रीदेवीविना पहिली दिवाळी होती.


  10 वर्षांपुर्वी बोनी श्रीदेवीला अशाच प्रकारे जेवण भरवताना दिसले होते
  - बरोबर 10 वर्षांपुर्वी म्हणजेच 2008 मध्ये दिवाळीच्या दिवशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा एक फोटो खुप व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये बोनी कपूर श्रीदेवीला आपल्या हाताने एक डिश खाऊ घालताना दिसत होते. विशेष म्हणजे ती डिशसुध्दा पनीर डिश होती. श्रीदेवींच्या अनुपस्थितीत बोनी कपूर यांचा लेकीसोबतचा हा फोटो खुपच भावुक करणारा आहे.

  याचवर्षी फेब्रुवारीमध्ये झाले होते श्रीदेवींचे निधन
  - श्रीदेवी आता या जगात नाहीत. पण बोनी आपल्या लेकींना त्यांची अजिबात कमतरता भासू देत नाहीत. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईच्या एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचे निधन झाले होते. त्या तिथे भाचा मोहित मारवाहच्या लग्नात गेल्या होत्या.

 • Khushi Kapoor Clicks The Diwali Feeding Picture With Boney And Janhvi In Frame
 • Khushi Kapoor Clicks The Diwali Feeding Picture With Boney And Janhvi In Frame

Trending