श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूरने शाहरुखचा मुलगा आर्यनला केले रिजेक्ट, या स्टार किडसोबत करू इच्छिते बॉलिवूड डेब्यू

माझ्या फिल्मचा हीरो माझे वडीलच निवडतील - खुशी कपूर...  
 

दिव्य मराठी

Apr 29,2019 05:38:00 PM IST

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरने फिल्म 'धडक'ने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले आहे. जान्हवीनंतर आता तिची धाकटी बहीण खुशी कपूरदेखील फिल्म जगतात पाऊल टाकू इच्छिते आहे. अशातच दोघी बहिणी एका टॉक शोमध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी एकमेकींविषयी खूप काही सांगितले.

शोमध्ये फिल्मविषयीही अनेक गप्पा झाल्या. जान्हवीच्या फिल्ममध्ये झालेल्या एंट्रीनंतर आता खुशीदेखील फिल्ममध्ये नशीब अजमावू इच्छिते. खुशी म्हणाली, 'मी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे, पहिली फिल्म मला करण जोहरसोबत करायची आहे, पण मला माहित आहे माझ्या फिल्मचा हीरो माझे वडीलच निवडतील. कारण ते माझ्यासाठी खूप प्रोटेक्टिव आहेत.'

खुशी कपूर म्हणाली, 'लोक माझ्याबद्दल बोलतात कि, मी कधी बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल तर मला हे सर्व आवडते. हे ऐकून मज्जा येते. मी अजूनही शाळेत आहे. म्हणून मी याबद्दल विचहर केला आहे पण आताच होणार नाही.'

शोची होस्ट नेहा धूपियाने खुशीला तीन ऑप्शन देत विचारले की, तिला यांपैकी कुणासोबत बॉलिवूड डेब्यू करायला आवडेल ? शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे की मग जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी. तर यावर खुशीने अहान पांडेचे नाव निवडले.

खुशी म्हणाली, 'मी या तिन्हींपैकी केवळ अहानलाच अभिनय करताना पहिले आहे म्हणून मला वाटते की हा सुरक्षित ऑप्शन असेल.' जान्हवी कपूरचे मात्र यावर वेगळे उत्तर होते. जान्हवीने खुशीच्या डेब्यूसाठी मिजान जाफरीला को-स्टार म्हणून निवडले. मात्र मागच्या काही काळात चर्चा होती की, खुशी, शाहरुखचा मुलगा आर्यनसोबत आपला बॉलिवूड डेब्यू करू शकते.

X