Home | Sports | From The Field | Kidambi Srikanth go down to Olympic champion Chen Long Indian challenge End

मलेशिया ओपनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात, ऑलिम्पिक पदक विजेता चेन लॉन्गने केला किदांबीचा पराभव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 05, 2019, 06:00 PM IST

महिला एकेरीच्या लढतीमध्ये पी.व्ही सिंधु, सायना नेहवाल आणि पुरूष एकेरीमध्ये एच.एस. प्रणव, समीर वर्माही स्पर्धेतुन बाहेर

 • Kidambi Srikanth go down to Olympic champion Chen Long Indian challenge End

  क्वालालाम्पूर - भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला मलेशिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चीनचा ऑलिंपिक पदक विजेता चेन लॉन्गने किदांबीला 21-18 21-19 च्या फरकाने हरवले. किदांबीच्या पराभवासोबतच स्पर्धेमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

  16-11 ची बढतीने किदांबीचा पराभव

  > लॉन्ग विरूध्द लढतीत किदांबी पहिल्या खेळात सुरूवातीला 16-11 ने पुढे होता. त्यानंतर लॉन्गने खेळात पुनरागमन केले आणि किदांबीला फक्त 2 अंक मिळवता आले. तर स्वतः सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.


  > दुसऱ्या सेटमध्ये किदांबी 11-17 च्या फरकाने मागे होता, त्यानंतर त्यांने पुनरागमन करत स्कोर 17-17 ने बरोबरीत केला, पण किदांबी मात्र आपला खेळ पुढे नेण्यात अपयशी ठरला. त्यानंतर लॉन्गने चार अंकाची बढत घेतली आणि किदांबीला फक्त एक अंक करता आला.


  > लॉन्ग विरूद्ध किदांबीचा हा सहावा पराभव आहे. आतापर्यंत दोघांमध्ये सात वेळेस आमने-सामने खेळले आहेत. यात किदांबीला फक्त एकदाच विजय मिळवता आला. किदांबीने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये लॉन्गला 22-20, 21-16 च्या फरकाने पराभूत केले होते.

Trending