आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांपुर्वी ज्या व्यक्तीवर केले प्रेम आणि लग्न, आता त्याने मुलांना पत्नीपासून केले दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरतपुर(राजस्थान): पांडिचेरी येथे राहणा-या मधुमालिनी या महिलेने कधीच भरतपुर पाहिलेले नव्हते. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून ती भरतपुरला फे-या घालतेय. कारण तिच्या दोन मुलांचे अपहरण झाले आहे. ती मानते की, तिचे मुलं याच परिसरात राहतात. मुलांच्या अपहरणाचा आरोप तिने तिच्या पतीवर लावला आहे. भागीरथ शर्मा असे त्याचे नाव आहे. 


महिलेसोबत तीन पोलिसहीसोबत आले आहेत 
तिने आरोप लावले आहे की, तिचा पती भागीरथ हा 7 वर्षांची मुलगी हिमांशी आणि 4 वर्षांचा मुलगा दनिशला 30 मे रोजी गुपचुप घेऊन आला आणि त्यांना लपवून ठेवले. मधुमालिनीने सांगितले की, याप्रकरणी पांडिचेरीच्या मॅक्टुपालयम पोलिस स्टेशनमध्ये 363 कलम अन्वये केस दाखल केली आहे. यासाठी तामिळनाडु हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर भागीरथ शर्मा विरुध्द वारंट जारी झाले आहे. मधुमालिनी ब-याच काळापासून आपले मामा एएस विनायकमसोबत दोन्ही मुलांचा शोध घेत आहे. त्यांच्यासोबत मॅक्टुपालयमचे पोलिस प्रभारी आर इनियन तसेच दोन जवान आहेत. शुक्रवारी त्यांनी एसपी केसरसिंह शेखावतसोबत भेट घेऊन स्थानिक पोलिसांना मदत मागितली. पोलिसांनी त्यांच्यासोबत भागीरथ शर्माच्या घरी अचानक गेले. परंतू एनवेळी तो स्वतः आणि त्याची मुलं भेटली नाहीत. यावर पोलिसांनी त्याच्या घरी नोटिसही पाठवली आहे. 

 

2500 किमीचा प्रवास करुन भरतपुरला आली 

विशेष म्हणजे मधुमालिनी आणि भागीरथ शर्माने काही काळापुर्वी लिबियाच्या त्रिपोली शहरामध्ये एकत्र नर्सचे काम केले होते. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी 2010 मध्ये प्रेमविवाह केला. परंतू काही काळानंतर त्यांच्यात वाद झाला. मामा एलएस विनायकने सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून मधुमालिनी मुलांसोबत पांडिचेरीमध्ये राहत होती. 30 मे रोजी ती हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यासाठी गेली, तेव्हा भागीरथ दोन्ही मुलांना घेऊन आला. मधुमालिनी म्हणाली की, मुलांवर माझा हक्क आहे आणि हा मी मिळवून राहिल. मला कितिही संघर्ष करावा लागला तरीही मी मुलांना मिळवेल.
 

बातम्या आणखी आहेत...