आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला वाचवण्यासाठी अनोळखी व्यक्तीशी आईने घेतला पंगा, शेवटपर्यंत लढत राहिली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक आई मुलीला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत आहे. ही घडना चीनच्या ताइपे शहरातील असल्याचे बोलले जातेय. व्हिडिओमध्ये दिसतेय की, एक महिला मुलीचा हात पकडून फुटपाथवरुन जात आहे. अचानक एक व्यक्ती मुलीचा हात पकडून तिला ओढू लागतो. आई एकटीच लढत राहते. आजुबाजूला उभे असलेले लोक बघ्याची भूमिका घेतात. आई मुलीला वाचवण्यासाठी पुर्ण ताकदीने त्याचा सामना करते आणि अखेर तीच विजयी होते. तो व्यक्ती अखेर पळून जातो. सीसीटीव्हीमध्ये तो अनोळखी व्यक्ती ओळखू येतो आणि त्याला काही वेळातच अटक करतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...