आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंटरनॅशनल डेस्क - ऐकण्यात हे एखादे फिल्मी कथानक वाटत असले तरीही प्रत्यक्षात ही घटना अमेरिकेत घडली आहे. नॉर्थ कॅरोलीना प्रांतात एका महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. महिला कराटे सेंटरमध्ये गेली. त्याचवेळी तिच्या मागे किडनॅपर सुद्धा घुसला. हीच चूक त्याला महागात पडली. लोकांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल सुद्धा झाले. परंतु, ज्या किडनॅपरला ते पकडण्यासाठी आले होते तो आपल्या पायांवर चालणे तर दूर उभा सुद्धा होऊ शकला नाही. परिणामी पोलिसांना त्याला स्ट्रेचरवर झोपवून न्यावे लागले.
पोलिस म्हणाले...
ही घटना नॉर्थ शार्लोट शहरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला आपल्या घराच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. आरोपी कुठल्याही परिस्थितीत तिचे अपहरण करणार होते. ती महिला एका कराटे सेंटरमध्ये गेली तेव्हा आरोपी सुद्धा तिच्या मागे कराटे सेंटरमध्ये घुसला. पोलिसांना गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास यासंदर्भात फोनवर माहिती मिळाली होती. ते अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत किडनॅपरला धडा शिकवण्यात आला होता.
आत घडले असे काही...
महिलेने सांगितल्याप्रमाणे, पाठलाग करणारा प्रत्येक ठिकाणी तिच्या मागेच होता. त्यात अचानक तिची नजर कराटे सेंटरवर गेली. आत काही लोक असल्याचा अंदाज तिने घेतला आणि वेळीच आत जाऊन तेथील लोकांना मदत मागितली. घाबरलेल्या महिलेला कराटे मास्टर रॅन्डल एफ्रेमने पाणी देऊन शांत होण्यास सांगितले. तेवढ्यात आरोपी कराटे सेंटरमध्ये घुसला. त्याला विचारणा केली असता त्याने याच महिलेचा शोध घेत असल्याचे सांगत तिचा हात धरला. तिला ओढून नेणार तेवढ्यात मास्टर एफ्रेमने आरोपी पकडून धो-धो धुतले. काही काही लाथा-बुक्क्यांमध्येच त्याची अवस्था अशी झाली की बसणेही कठिण झाले. तोपर्यंत घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीला पकडले आणि स्ट्रेचरवर नेले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.