आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एक कारणामुळे गुंडाना जावे लागले पळून, महिला राहिली सुरक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर (छत्तीसगढ) - मुंगेली जिल्ह्यात एक नवविवाहिता लग्नसोहळा पूर्ण करून रात्री उशिरा पती आणि भावासोबत बाईकवरून घरी येत होती. तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून चाललेल्या बदमाशांची नियत बिघडली आणि त्यांनी महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पती-पत्नीच्या प्रतिहल्ल्यामुळे ते यशस्वी झाले नाहीत. महिलेने ओरडून लोकांना मदत मागितली. महिलेच्या आवाजाने तेथे लोक येत असलेले पाहून गुंड पळून गेले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नाकाबंदी करून एका ढाब्यावरून चार आरोपी अरुण राजपूत, सुकेश साहू, अभिषेक राजपूत आणि एक अल्पवयीन मुलाला अटक केली. या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरु आहे.


नवविवाहितेला पाहून बदलली गुंडांची नियत
पोलीस अधीकारी के.एन. आदित्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरहागाव निवासी एक तरुण आपल्या 19 वर्षीय पत्नी आणि 13 वर्षीय मेव्हण्यासोबत बाईकवरून लग्नासाठी बिरगहनी येथे गेले होते. तेथून रात्री 1.30 वाजता परत निघाले होते. तेवढ्यात पांढऱ्या रंगाची एक स्कॉर्पिओ त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि कुठे चालले आहात असे गाडीतील लोकांनी त्यांना विचारले. त्यांनी लग्नाला गेलो होतो असे सांगितले. त्यानंतर स्कॉर्पिओ पुढे जाऊन काही अंतरावर थांबली. त्यानंतर स्कॉर्पिओमधील सहा लोक बाहेर आले आणि त्यांनी पतीला मारहाण करण्यास रुवात केली. काही लोक महिलेला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु दोघांनीही धाडस दाखवून त्या गुंडांचा सामना केला आणि मदतीसाठी ओरडू लागले. लोकांना येत असलेले पाहून गुंड पळून गेले आणि मोठी दुर्घटना टळली.