आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 लाख रुपयांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करून खून, आरोपी मित्र पोलिसांच्या ताब्यात; भोसरी येथील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मित्राला पार्टीसाठी बोलावले, विद्यापीठाच्या आवारात नेऊ केली हत्या
  • नंतर वडिलांना फोन करून मागितली 40 लाखांची खंडणी

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  रविवारी पहाटे एका 17 वर्षाच्या मुलाची मित्रानेच हत्या केली. हत्या करणारा संशयित मृत मुलाचा चांगला मित्र आहे. 40 लाखांच्या खंडणीसाठी त्याने आपल्या मित्राची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृताची ओळख दापोडी येथील अब्दुल अहद सय्यद सिद्दीकी अशी आहे. मित्राच्या खूनाच्या आरोपात पोलिसांनी आरोपी उमर नासिर शेखला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक शंकर अवतासे यांनी सांगितले की, सिद्दीकी आणि शेख दोघेही चांगले मित्र होते. शेखने सिद्दीकीला शनिवारी उशिरा रात्री पार्टीसाठी बोलावले होते. यानंतर तो मित्राला घेऊन विद्यापीठाच्या आवारात घेऊन गेला आणि तिथे त्याची हत्या केली. त्यानंतर शेखने सिद्दीकीच्या वडिलांना फोन केला आणि तुमच्या मुलाचे अपहरण केल्याचे सांगत 40 लाखांच्या खंडणीची मागणी केली.  सिद्दीकी सिटी कॉलेचचा विद्यार्थी होता तर शेखने शाळा सोडलेली होती.
सिद्दीकीच्या वडील टांगा चालवतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दरम्यान सिद्दिकीचे वडील टांगा चालवतात म्हणजे खंडणीशिवाय इतरही कारणामुळे सिद्दिकीचा खून केला असेल असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.