Home | National | Other State | Kidnapping, in Panipat girl recovered after 6 hours

10 मिनीट मुलीसोबत केले अश्लील कृत्य, नंतर सायकलवर बसून झाला गायब...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2019, 02:07 PM IST

पानीपतमध्ये रविवारी झालेल्या धक्कादायक घटनेची सीसीटीव्ही फूटेज समोर

  • पानीपत(हरियाणा)- घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकीचे अपहरण केल्याची धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज समोर आली आहे. अपहरण करण्यापूर्वी 10 मिनीटापर्यंत आरोपी मुलीला लाडीगोडी लावू लागला, त्याशिवाय तो तिच्यासोबत अश्लील कृत्य करतानाही दिसला. अपहरणाच्या अंदाजे 6 तासानंतर त्याने मुलीला सोडून पळ काढला.


    - घटना जाटल रोडवर सौंधापूर चौकाजवळ रविवारी सकाळी 11.58 वाजता घडली. जवळच असलेल्या एका फॅक्टरीमधल्या सीसीटीव्ही कॅमेरात संपूर्ण घटना कैद झाली आहे. मुलीच्या शोधासाठी SP सुमित कुमार यांनी 200 पोलिसांना कमाला लावले. अंदाजे 6 तासानंतर मुलगी भादड गावात मिळाली.
    - पोलिसांना आरोपीची ओळख झाली आहे, जयभगवान असे आरोपीचे नाव आहे. तो शेती करतो आणि त्याला तीन मुले आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात अपहरण आणि पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
    - आरोपी एका दुकानजवळ पानी पिण्यासाठी थांबला असता मुलगी रडू लागली. संशय आल्यामुळे लोकांनी त्याला थांबवले. यामुळे घाबरून तो मुलीला सोडून पळून गेला पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केले.

Trending