आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसाढवळ्या हिंगोलीत अल्पवयीन मुलीचे अपहरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - शहरातील जिजामातानगर भागातील एका तरुणीचे दिवसाढवळ्या जीपमध्ये टाकून अपहरण करण्यात आले.  या वेळी प्रतिकार करणाऱ्या पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला अपहरण करणाऱ्या तिघा जणांनी बेदम मारहाण केली. याबाबत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात पीडित मुलीचे वडील रवींद्रनाथ शिवाजी पाईकराव यांच्या फिर्यादीनुसार आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांची १७ वर्षीय मुलगी रमिता घरी असताना पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जीपमध्ये अज्ञात ३ तरुण आले. त्यांनी पीडित मुलीला जबरदस्तीने जीपमध्ये बसून नेण्याचा प्रयत्न केला असता पीडित मुलीची मोठी बहीण प्रतिकार करण्यासाठी पुढे आली. या वेळी आरोपी तिघांनी तिला बेदम मारहाण करून खाली पडले आणि त्यानंतर सदर तरुणीला ते जीपमध्ये बसवून पळून गेले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपहरण करणारे तरुण कोण आहेत आणि त्यांनी सदर तरुणीला का पळून नेले? याबाबत पोलिसांकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. परंतु सदर प्रकरण प्रेमप्रकरणातून झाले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.