आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 लाखांच्या खंडणीसाठी नगरच्या उद्याेजकाचे अपहरण; दाेन अटकेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर : शहरातील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणाचे गूढ अखेर उलगडले. सराईत गुन्हेगार अजहर मंजूर शेख (३७ वर्षे, रा. बेलदार गल्ली, सर्जेपुरा) याने २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी या अपहरणाचा कट रचला होता. अजहरच्या दोन साथीदारांना पोलिसांनी मंगळवारी जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक केली. मास्टरमाइंड अजहर व त्याचा अाणखी एक साथीदार मात्र फरार झाला आहे.
नगर येथील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपहरण झाले होते. मात्र, काही तासांमध्येच त्यांची सुखरूप सुटका झाली. मात्र, हे अपहरण कोणी व कशासाठी केले? हुंडेकरी यांची सुटका कशी झाली? आदी प्रश्न अनुत्तरीत होते. मंगळवारी हे गूढ उलगडले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने दोन आरोपींना परतूर येथून अटक केली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अजहर शेख याच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला असल्याचेही या आरोपींनी सांगितले. वैभव विष्णू सातोनकर (१९, रा. सातोनकर गल्ली, ता. परतूर, जि. जालना) व निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (२०, रा. लढ्ढा कॉलनी, ता. परतूर, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी परतूर येथे असल्याची माहिती पाेलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी पहाटे छापा टाकून दोन आरोपी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे इतर दोन आरोपींबाबत विचारणा केली असता ते चहा पिण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ रेल्वे स्टेशन गाठले. परंतु, पोलिसांची चाहूल लागताच अजहर व त्याचा एक साथीदार तेथून पसार झाले.
 

बातम्या आणखी आहेत...